वंचितच्या जिल्हा कार्यालयात मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन
यवतमाळ / प्रतिनिधी
आज वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात डॉ.नीरज वाघमारे- जिल्हाध्यक्ष, यवतमाळ यांच्या नेतृत्वात मनुस्मृति दहन दिनानिमित्त मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती या विषमतावादी आचारसंहितेला जाळून वंचित बहुजनाच्या आणि महिलांच्या मुक्तीचा मार्ग खुला करून स्त्री -शुद्रातिशुद्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक, आणि धार्मिक प्रगतीत अडसर ठरलेल्या मनुस्मृतीला नष्ट करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले होते.
त्या दिवसाच्या स्मृतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी , महिला आघाडी व युवा आघाडी तसेच आजी-माजी पदाधिकारी व हितचिंतक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ.नीरज वाघमारे- जिल्हाध्यक्ष यवतमाळ, धम्मवती वासनिक-अध्यक्षा,
महिला आघाडी, पुष्पा शिरसाट -महिला महासचिव, भारती सावते-सचिव, विलास वाघमारे- शहर उपाध्यक्ष, उत्तमराव कांबळे-शहर कोषाध्यक्ष,
शोभना कोटंबे, महिला शहराध्यक्षा ,करूणा मून, शमिका भरणे-शाखा सचिव, माधुरी लोणारे,प्रेरणा चक्रे, माया लोखंडे, शैलेश भानवे,उत्तम पाटील, गोलू शिरसाट, सुरज मेश्राम, आशिष वानखडे, नितेश बाहादे ,अंकुश वानखडे, हितेश गेडाम आणि रियांश
इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.