खेळ व क्रीडा

सूर्या आणि चमू कडून लंका दहन 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

                        काल चा सामना जिंकत टीम इंडिया ने T 20 मालिकेत   2-0 ने विजय मिळवत विजय मिळविला आहे. हा विजय नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव आणि नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मनोबल उंचावणारा आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नव्या पर्वाला सुरवातं झाली आहे.श्रीलंकेत ही मालिका सुरू आहे. 

विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवची टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. कर्णधार म्हणून सूर्याची ही पहिलीच सीरिज होती, तर गौतम गंभीरचीही टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून पहिली सीरिज आहे. सूर्या आणि गंभीरच्या जोडीने त्यांच्या पहिल्याच सीरिजमध्ये धमाका केला आहे.

दुसऱ्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय बॉलरनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 161/9 वर रोखलं. रवी बिष्णोईने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर अर्शदीप सिंग, अक्सर पटेल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक 53 रन केल्या. याशिवाय पथुम निसांकाने 32 आणि कामिंदू मेंडिसने 26 रनची खेळी केली.

या आव्हानाचा पाठलाग करायला आल्यानंतरच पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 8 ओव्हरमध्ये 78 रनचं आव्हान आलं. हे आव्हान भारताने 6.3 ओव्हरमध्ये पार केलं. यशस्वी जयस्वालने 15 बॉलमध्ये 30 रन, सूर्यकुमार यादवने 12 बॉलमध्ये 26 आणि हार्दिक पांड्याने 9 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले. संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर शून्य रनवर आऊट झाला. श्रीलंकेकडून महिश तीक्षणा, वानिंदू हसरंगा आणि मथीशा पथिराणा यांना 1-1 विकेट मिळाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close