जातेगाव च्या श्री भैरवनाथ देवस्थान च्या उपाध्यक्ष पदी सुरेश बोरूडे व सहसचिव पदी विशाल फटांगडे
.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या उपाध्यक्ष पदी सुरेश बो-हुडे व सहसचिव विशाल फटांगडे पदी निवड करण्यात आली .
भैरवनाथ देवस्थान चे सचिव सचिन ढोरमले यांनी उपाध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीसाठी विश्वस्त मंडळाची सभा बोलवण्यात आली होती . देवस्थानच्या उपाध्यक्ष पदी सुरेश बोरुडे यांच्या नावाची सुचना विश्वस्त जयसिंग धोत्रे यांनी मांडली व त्याला अनुमोदन विशाल फटांगडे यांनी दिले व सहसचिव पदासाठी विशाल फटांगडे यांच्या नावाची विश्वस्त दत्तात्रय ढोरमले यांनी सुचना मांडली व अनुमोदन कार्याध्यक्ष विजय जगताप यांनी दिले . या दोन्ही पदांची निवड एकमताने करण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सौ सुनिता पोटघन या होत्या .
जातेगाव येथील जागृत भैरवनाथ देवस्थान हे निसर्गरम्य वातावरणात असल्याने राज्यातील भविकांची येथे नेहमीच वर्दळ असते .
यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके, अध्यक्षा सुनिता विठ्ठल पोटघन , सचिव सचिन ढोरमले , माजी सरपंच विठ्ठल पोटघन , कार्याध्यक्ष विजय जगताप , खजिनदार शिवराम पोटघन , दत्तात्रय ढोरमले , निर्मला कळमकर , शिवाजी भगत , उपसरपंच सोनाली ढोरमले , जयसिंग धोत्रे व इतर मान्यवरांबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते .
नूतन उपाध्यक्ष पदी निवड झालेले सुरेश बो-हुडे हे सहकार क्षेत्रातील नामवंत असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्षपदी कार्यरत असून नारायण गव्हाणचे सरपंच पद ही भूषविलेले नामांकित व्यक्ति महत्त्व आहे . तर सहसचिव पदी निवड झालेले विशाल फटांगडे हे पारनेर तालुक्यात प्रसिद्ध पत्रकार असून राज्यातील सर्वांत मोठ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत .
या नूतन पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , प्रदेश सचिव डॉ . विश्वासराव आरोटे , जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , तालुकाध्यक्ष संतोष तांबे , उपाध्यक्ष वसंत रांधवण , सचिव संतोष कोरडे , सहसचिव ॲड . सोमनाथ गोपाळे , सदस्य दिपकराव वरखडे व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .