महसूल कर्मचा-यांचे कामबंद आंदोलनाला उमरी कोतवाल संघटनेचा पाठिंबा
बिलोली (प्रतिनिधि):
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी सोमवार पासून महसूल विभागातील कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे महसूल कर्मचार्यांच्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी मागण्या प्रलंबित आहेत.
महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंद तत्काळ देण्यात यावा, नायब तहसीलदार ग्रेड पे ४००० हजार ४८०० करण्यात यावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी यांच्या करिता विभागीय परीक्षा सरळ सेवा बाबतचे प्रमाणे ७ ऑक्टोंबर २०२० असे करावे शिपाई कर्मचार्यांना तलाठी संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात यावे कोतवाल पदाचा श्रेणीच्या दर्जा देण्यात यावा, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार प्रवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश काढण्यात यावेत महसूल विभागाच्या आकृतीबंद मंजकूर करून महसूल
विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर महसूल विभागात समावून घ्यावे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा, महसूल सहकार्यांचा ग्रेड पे १९०० वरून २४०० करण्यात यावा, महसूल सहकार्यांची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट अर्हता परीक्षा नियमामधील तरतुदीनुसार तयार करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारपासून उमरी महसूल कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे तर कोतवालांना
चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागण्याकरिता महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाला उमरी कोतवाल संघटनेचा पाठिंबा दर्शवत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर उमरी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष यम्मेवार डी के, राठोड आर एम, कमळे एम एच, हनवते डी बी, देवके डी एल, ढगे एस आर, शेख एम ए, कदम एम , तोटेवाड एस आर, बारटक्के व्ही यु, वडजे के आर, हनवते यु बी. अधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.