सुपर स्पेशालिटी चा विषय पालकमंत्र्यांच्या दालनात
वर्षानुवर्षे होणाऱ्या आर्थिक पिळवणूकी विरोधात सुपर स्पेशालिटीच्याच्या 115 कामगारांचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदन..
मंत्रालयात बैठक लावून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंबंधी मंत्र्यांकडून 115 कामगारांना आश्वासन..
अमरावती / प्रतिनिधी
सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये 2008 पासून रुग्णालय अस्तित्वात आल्यापासून या ठिकाणी वर्ग 4 या पदांवर 115 कर्मचारी अत्यंत कमी वेतनामध्ये आपली सेवा देत आहे ,महागाई पाहता वेतन इतके कमी आहे की या वेतनामध्ये संपूर्ण कुटुंबाची उपजीविका भागविणे सुद्धा कठीण आहे तसेच यामध्ये विधवा निराधार व अपंग महिला कर्मचारी यांची संख्या अधिक आहे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा येथून मिळणाऱ्या वेतनावरच अवलंबून आहे या सर्व समस्या बाबतीत माननीय कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे अमरावती दौऱ्यावर असताना सुपर स्पेशालिटीच्या 115 कर्मचाऱ्यांकडून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देऊन सर्व कर्मचाऱ्यांनी आपली आपबीती त्यांच्यासमोर मांडली मंत्रिमहोदयांनी सुद्धा यावर सकारात्मक पाऊल उचलून या विषयासंबंधीची लवकरच मंत्रालयामध्ये बैठक लावून सदर कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्याबाबत तातडीची पावले उचलण्या जाण्याबाबत मंत्री महोदयांनी 115 कर्मचारी यांना आश्वासित केले, त्यावेळी सुपर स्पेशालिटी मधील सर्व 115 कर्मचारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते..