सुनेत्रा पवार यांना पुन्हा घ्यावी लागणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ?

नागपूर /विशेष प्रतिनिधी
स्व.अजित दादा यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.पण सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना पुन्हा सपथ घ्यावी लागेल आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, या चार दिवसांतच त्यांचा शपथविधी बेकायदेशीर ठरला असे पत्र खुद्द राज्यपालांना देण्यात आले असून पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पुन्हा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे नेमके कारण काय? पाहूया.
वर्धा येथील ॲड. हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी राज्यपालांना एक पत्र दिले आहे. यामध्ये शपथविधी कसा बेकायदेशीर आहे हे सांगितले. त्यांच्या पत्रानुसार, सुनेत्रा अजित पवार यांचा राजभवन येथे उप-मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. तो सर्व शपथविधी सर्व प्रसार माध्यमांवर लाईव्ह प्रसारित केला होता. त्या संदर्भात राज्यपाल यांचे पत्र क्रमांक एल बी/ॲडमिन-२०२६/ओर्थ-डीसीएम/सीआर-०१३/१७२ सोशल मिडिया मधून मिळाले. त्यात सुद्धा उप-मुख्यमंत्री पदाचा उल्लेख आहे.
राज्यपाल यांच्या कार्यालयातून सुद्धा ३१ जानेवारीला प्रसिद्धी पत्रक देण्यात आले. त्यातही उप-मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. परंतु भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६४ नुसार मंत्र्यासंबधी अन्य तरतुदींमध्ये मुख्यमंत्री, राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इत्तर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्यानुसार राज्यपालांकडून नियुक्त केले जातील अस उल्लेख आहे. राज्यपालाची मर्जीअसे पर्यंत ते मंत्री पद धारण करतील. मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्या प्रयोजनार्थ तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार त्यास पदाची व गोपनियतेची शप्पथ देईल अशी तरतूद आहे. भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचित राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला आहे. तो पुढीलप्रमाणे,
”मी– ईश्वर साक्ष शपथ घेतो की / गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. (मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन) मी……. राज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व सदसदविवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल.
बेकायदेशी ठरण्याचे कारण काय दिले?
०१/०२/२०२६ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सुनेत्रा अजित पवार यांना दिलेल्या शपथविधीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचे दोनदा म्हटले आहे. जे की असंवैधानिक व भारतीय संविधांच्या विरोधात आहे. भारतीय संविधानात कुठेही उप-मुख्यमंत्री पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर आहे म्हणून सुनेत्रा अजित पवार यांना रीतसर भारतीय संविधानाच्या ३ अनुसूचित राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला आहे. त्यानुसार शपथ देऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी देलेल्या खात्याची जबाबदारी यावी. अन्यथा महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्यांच्यावर भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडूनच खुलेआम भारतीय संविधानाचे उल्लंघन होत आहे असा संदेश जाईल.




