राजकिय

सुधीर मुनगंटीवार म्‍हणजे कर्तृत्‍व-वक्‍तृत्‍व-नेतृत्‍वाचा तिहेरी संगम – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

सुधीर मुनगंटीवार यांनी केले नामांकन अर्ज दाखल.
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
महाराष्‍ट्राच्‍या सत्‍तेत परिवर्तन घडवून आणणारे, राज्‍याला हिरवेगार करणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे सुधीर मुनगंटीवार हे नेतृत्‍व-वक्‍तृत्‍व–कर्तृत्‍व याचा तिहेरी संगम असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा,असे आवाहन महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेला केले.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीb मंगळवारी, २६ मार्च २०२४ रोजी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी गांधी चौकात आयोजित करण्‍यात आलेल्‍या सभेला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी खा. हंसराजजी अहिर, खा. रामदास तडस, आ. संदीप धुर्वे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ.अशोक उईके, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार आशीष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन निमकर,भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत,प्रमोद कडू, राजेंद्र गांधी विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर,लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर,भाजपा महिला प्रदेश सचिव वनिताताई कानडे, भाजपा नेते अशोक जीवतोडे,राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर, राजीव कक्कड, भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, बंडू हजारे, आरपीआयचे अध्यक्ष गौतम तोडे, हरीश दुर्योधन, सिद्धार्थ पथाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्याताई गुरनुले, ब्रिजभूषन पाझारे, अलका आत्राम, रामपाल सिंग, विवेक बोढे, राजू गायकवाड,सूरज पेदुलवार, मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी व हजारो भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*चंद्रपूरची तोफ दिल्‍लीत धडकणार*
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्‍ताने संपूर्ण देशातून त्‍यांना मानवंदना मिळवून दिली. इंग्रजांनी चोरून नेलेली ऐतिहासिक छत्रपतींची वाघनखे परत आणण्‍यासाठी धडपड केली. अशा अनेक अस्मितेच्या मानकां संदर्भात त्‍यांनी उत्‍तम काम केले आहे. त्‍यांनी विकासाची गंगा आणून चंद्रपूरचा चेहेरामोहरा बदलला आहे. चंद्रपूरचे मुलुख मैदान गाजवणा-या ना. सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आतापर्यंत मुंबईत धडकत होती आता ती दिल्‍लीत धडकणार आहे, अशा आशावाद उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

विकासाचे दुसरे नाव सुधीर मुनगंटीवार
ही राज्‍याची नाही तर देशाची निवडणूक असून देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्‍व कोणाच्‍या हाती द्यायचे याचा निर्णय जनतेने घ्‍यायचा आहे. देशामध्‍ये मोदीजींचे राज्‍य आणायचे की राहूल गांधींचे हे ठरवायचे आहे. देशाचा विकास करायचा असेल तर सर्व समाजाला जो सोबत घेऊन चालू शकतो, समाजाची दु:ख मांडू शकतो अशा नेत्‍यालाच निवडून द्या. तसा नेता म्‍हणजे सुधीर मुनगंटीवार असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी निवडून देण्‍याचा निर्धार चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेने करावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

 

सुधीरभाऊ राहणार ‘एक नंबर’वर
महाराष्‍ट्रामध्‍ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कोठून करायची यावर जेव्‍हा विचारमंथन झाले तेव्‍हा सर्वांनी एकमताने चंद्रपुरात सुधीर मुनगंटवार यांचे नाव ठरवण्‍यात आले. ही सुरुवात चांगली झाली आहे. ज्‍याची सुरुवात चांगली होते त्‍याचा शेवटही चांगला होतो. त्‍यामुळे सुधीरभाऊ ‘एक नंबर’वर असून आता ‘अबकी बार ४०० पार’ करून मोदीजींना परत एकदा पंतप्रधान बनवून विकासीत भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प आपण करायचा आहे, असे उपमुख्‍यमंत्री म्‍हणाले.

 

सुधीरभाऊंना ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून द्या : चंद्रशेखर बावनकुळे
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थशास्‍त्र कळते, त्‍यांना महाराष्‍ट्राची नाळ कळते. आतापर्यंत हंसराज अहीर यांनी चंद्रपूरचा विकास केला. त्‍याच्‍या दहापट विकास विकास करायचा असेल तर ना. सुधीर मुनगंटीवार हा एकमेव नेता आहे. सर्वांनी एकत्र येऊन सुधीर भाऊंना ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून द्यावा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close