हटके

अचानक रस्ता खचला 40 ते 50 गाड्या खड्ड्यात सामावल्या 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क  .

              मुंबईत कधीही काही होऊ शकते  अशी शंका वैज्ञानिकांकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना देखील जनता काही मानायला तयार नाही. ती मनमर्जी वागत आहे. सध्या मनुष्य हा निसर्गाला चॅलेंज करीत असल्याने अश्या घटना घडत असल्याचे समजते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर मधुन एक अशीच धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर येत आहे. राहुल नगर येथील एसआरए इमारतीसमोर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या  40 -50 कार सह दुचाकी खड्ड्यात सामावल्या आहेत.

याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे. वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर येथील एसआरए इमारतीसमोर रस्ता खचल्याचा हा प्रकार घडला आहे. चुनाभट्टीमध्ये जमीन खचली असून या खड्ड्यात 40-50 गाड्या कोसळल्या आहेत. ज्यामुळे लोकांना तेथून येण्याजाण्यास अडचण निर्माण होतेय.

आजुबाजूच्या बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढून बिल्डिंग खाली करण्यात आल्या आहेत. घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत. लोकांना याठिकाणावरुन प्रवास करताना त्रास होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक चार चाकी या खचलेल्या रस्त्यात घसरत जाताना दिसतेय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना बाहेर पडण्यास अडचण होतेय. यातच चेंबुरमध्ये रस्ता खचला. त्यामुळे लोकांचा संताप होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close