हटके

अचानक वाघ आला व्यक्तीच्या समोर 

Spread the love

नवी दिल्ली  / विशेष प्रतिनिधी 

              सगळ्यात हिंस्त्र पशू मध्ये सिंह आणि वाघाची गणना होते. अचानक वाघ तुमच्या समोर आला किंवा तुम्ही वाघाच्या समोर आला तर मग काय ? अशीच घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघासमोर व्यक्तीने मृत्यूचं नाटक केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वाघासमोर कोणताही प्राणी, माणूस आला तर तो त्याच्यावर हल्ला करणारच. त्यामुळे त्याच्यापासून दूर गेलेलं चांगलं. पण ही व्यक्ती वाघासमोर मृत्यूचं नाटक करत झोपली. या व्यक्तीचं काय झालं असेल, याचा विचार करून अंगावर काटा येतो. पण या व्यक्तीसोबत वाघाने जे केलं ते आश्चर्यकारक आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती उभी आहे. तिच्या समोर पांढरा वाघ आहे. वाघाला पाहताच व्यक्ती आपल्या छातीवर हात ठेवते आणि खाली कोसळते. वाघ तिथंच समोर आहे.

जशी ती व्यक्ती खाली पडते तसा वाघ धावत त्या व्यक्तीजवळ जातो. त्याच्या अंगावर चढतो. त्याचा वास घेतो, मग त्याला चाटतो त्याचा हात आपल्या जबड्यात धरतो. हे दृश्य पाहिल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. काही वेळाने वाघ तिथून बाजूला होतो.

पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर वाघ या व्यक्तीला काहीच करत नाही. तो त्याचा पाळीव वाघ आहे असं व्हिडिओवरून दिसतं. जो मालकाला पडलेलं पाहताच त्याला वाचवायला धावतो. त्याला उठवण्यासाठी धडपडतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स घाबरले. तर काहींनी प्राण्यांनाही हृदय असते, असं म्हटलं आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. हा व्हिडिओ इंडोनेशियाच्या अलशाद अहमदचा आहे. तो या वाघासोबतच नाही तर इतर वाघ आणि इतर अनेक प्राण्यांसोबतही दिसतो. बऱ्याच लोकांना ते खूप गोंडस वाटले आणि काहींना ते खूप भयानक वाटले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close