क्राइम
अखेर त्या गंभीर युवकाचा मृत्यू ; दोन आरोपीना अटक
मंगरूळ दस्त / प्रतिनिधी
मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशातून
मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा अखेर सावंगी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगरूळ दस्तागिर ठाण्यात आरोपी विरिद्ध हत्येसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा कसून शोध घेणे सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अभिषेक मारोतराव गायकवाड 20 रा. पुलगाव याने डंक उर्फ रितिका श्रीवस रा. पुलगाव याला पुलगाव येथे डोक्यावर फरशी मारून जखमी केले होते. अभिषेक याला या घटनेचा रितीक बदला घेईल अशी भीती असल्याने तो बोरगाव धांदे येथीक त्याच मित्र अतुल रामचंद्र सवाळे याच्या कडे आला होता. दरम्यान रितीक हा त्याचे मित्र साहिल काळे तुषार धांदे , स्वराज काळे सौरव वर्गने , ऋषिकेश म्हस्के ,अनिकेत बोदिले , रवी मेश्राम , शेरा रा.पुलगाव जिल्हा वर्धा यांना घेऊन दुचाकीने बोरगाव धांदे येथे आले. व त्यांनी फावड्याचे दांडे आणि चाकूने त्याच्यावर हल्ला करन जखणी केले.
अभिषेक याला गंभीर जखमी अवस्थेत सावंगी मेघे येथे भरती करण्यात आले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यावरून आरोपी विरुद्ध अप नं 154/23कलम*
302, 143, 144,147, 148, 149 , 120 (ब ) भा. द. वि. सहकलम 135 मुपोका गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुरज तेलगोटे। करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1