सारडा महाविद्यालयात “मी सावित्री बोलते” या एक पात्री प्रयोगाचे यशस्वी आयोजन
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथे ‘मी सावित्री बोलते’ या एक पात्री प्रयोगाचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले. या प्रयोगासाठी प्रमुख कलाकार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अपूर्वा अरुण सोनार रा.परतवाडा या लाभल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रयोगातून सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित अभिनय सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ वशिष्ठ चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनात महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक डॉ. कविता मालोकार आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ अंशुमती कहाने यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ बीना राठी इंग्रजी विभाग प्रमुख आणि आयक्यूएसीचे समन्वयक डॉ मंगेश डगवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ नविता मालानी यांनी केले. प्रास्ताविक डॉ कविता मालोकार यांनी केले असून आभार प्रदर्शन डॉ अंशुमती कहाने यांनी केली.कार्यक्रमाला समितीतील सर्व सन्माननीय सदस्य आणि माजी विद्यार्थिनी सौ. वर्षा भुयार उपस्थित होत्या. या सोबतच डॉ. ममता यवतकर, डॉ प्रतिभा थोरात, डॉ ताई उके, डॉ.झिलपे, कु.प्रणाली धुळे डॉ भटकर, सौ.लीना गोमाशे, सौ. शिल्पा कुऱ्हेकर,प्रा.सोनल चौधरी, प्रा.आशा बानाईत यांची उपस्थिती होती. बहुसंख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.