सामाजिक

ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन करिता उपोषणाला सुरुवात

Spread the love

 

जवाहरनगर :- भारत सरकारच्या संरक्षण विभागाची जुनी पेन्शन पूर्ववत सुरू करावी यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन तर्फे फॅक्टरी चे मेन गेट समोर भुख हळताल उपोषण दिनांक ८ ते ११ जानेवारी पर्यंत सुरुवात केली आहे
केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या आवाहनावर ८ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन( लाल) भंडारा व न्यु एकस्पलोसिव फॅक्टरी वर्कर युनियन ( इंटक) यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनशी संलग्न व इंटक युनियनचे सरचिटणीस कालिदास धकाते, चंद्रशिल नागदेवे यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथील मुख्य गेटसमोर उपोषणाला सुरुवात केले.आहे.पहिल्या दिवशीचे उपोषण शांततेत सुरू झाले. एकच मिशन आणि जुनी पेन्शन आणि युनियनचे कार्याध्यक्ष भरत बारई यांनी उपोषणादरम्यान चर्चेदरम्यान सांगितले की, नवीन पेन्शन योजनेतील कोणतीही दुरुस्ती आम्हाला मान्य नाही.जी सरकारला हवी आहे. या उपोषणात प्रमुख सहभागी युनियनचे पदाधिकारी कैलास जगताप, गजेंद्रसिंग कुरवटी, अतुल पाटील, तुषार चौधरी, पवन वट्टी, प्रमोद सातदेवे, नीलेश दुधे, अमरदीप सुखदेवे, नितीन कोटनागले, अमोल हाडे, अमित गोंडाणे, मनीष शिवणकर, प्रशांत कोचे, आदी उपस्थित होते. दिनेश पटले, राहुल गिरीपुंजे, टेकराम बावनकर, मिलिंद चहांदे, पारख कुमार, चेतन वाकडे, सुरेश मोरया, गोपाल सिंग, संजीव बोरकर, विजय बागडे, विठ्ठल कुंभारे, राजेश अण्णा मोटघरे.
चंद्रशिल नागदेवे,संघरक्षित गजभिये,कुंदन चौरे,कुलदीप खोब्रागडे,एकनाथ कुंजेवार
दिनेश झिंगरे असे एकूण ४० कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत
…………

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close