शैक्षणिक
विद्यार्थ्यानी प्रयोगशील असावे – एसपी लोहित मतानी
भंडारा / प्रतिनिधी
विज्ञान भारती विदर्भ रीजन, जे. एम.पटेल कॉलेज भंडारा तसेच जेसीस कॉन्व्हेंट भंडारा तर्फे आयोजित “विज्ञान संस्कार शिबिराचे “समारोपिय कार्यक्रम जे. एम. पटेल महाविद्यालय येथे दि. 1 मे रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय लोहित मतानी साहेब उपस्थित होते तसेच जे. एम. पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जेसिस कॉन्व्हेन्ट च्या प्राचार्या श्रीमती रंजना दारवटकर, जे. एम.पटेल कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष चे प्रमुख डॉ. श्री कार्तिक पन्नीकर सर, विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक डॉ.राजेंद्र शहा मंचावर उपस्थित होते.
प्रथम Dr. शाह यांनी प्रास्ताविक करून संपूर्ण शिबिराविषयी माहिती दिली.
पोलीस अधीक्षक माननीय श्री लोहित मतानी साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषनातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी विज्ञान संबंधी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.
दी.23 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित “विज्ञान संस्कार शिबिरात”भंडारा शहरातील एकूण 25 शाळांमधील 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रोज दोन तास फिजिक्स, केमिस्ट्री ,बॉटनी ,झूलॉजी, कॉम्पुटर सायन्स व मायक्रोबायोलॉजी या विविध प्रयोगशाळांमधून विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून प्रयोगशाळेतील कार्याचा आनंद घेतला. विविध प्रयोगशाळांमध्ये जे. एम. पटेल कॉलेज व जेसीस कॉन्व्हेंट येथील प्राध्यापक व इतर स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,त्यांचे विज्ञान भारती तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. शिबिरात रोज एक तज्ञ व्यक्तीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यामध्ये साकोली येथील प्रा. डॉ.खुशाल बोरकर, प्रा.कु.कावेरी बनकर, डॉ. प्रवीण घोसेकर, श्री प्रमोद सेलोकर, डॉ. राजेंद्र शहा, श्रीकांत ठाकरे व सौ. पूजा ठाकरे यांनी
मार्गदर्शन केले . दी.24 एप्रिल रोजी प्राध्यापक विवेक वाघ खगोलशास्त्र तज्ञ यांचे मार्गदर्शनाखाली रात्रीच्या आकाशात विद्यार्थ्यांसोबत “आकाश दर्शन” या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रह /तारे टेलिस्कोपच्या साह्याने जवळून पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी श्री सहसराम बनसोड सर यांनी सुद्धा आपल्या स्वतः जवळील टेलिस्कोपद्वारे विद्यार्थ्यांना आकाश दर्शन कार्यक्रम अंतर्गत सहकार्य केले.
दी.30 एप्रिल रोजी गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार येथे सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी भेट देऊन गोमाते विषयी माहिती व तेथील संशोधनकार्या बाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
संपूर्ण शिबिरात विज्ञान भारती परिवारातील डॉ. संजय एकापूरे, श्री वसंत सोमकुवर सर, प्रा. सीमा गोंडनाले मॅडम, श्री प्रदीप जी ढबाले, श्री करण साठवणे, श्री भीष्म टेंभुर्ने सर, श्री प्रमोद सेलोकर, श्रीकांत ठाकरे ,सौ. पूजा ठाकरे, श्री बनसोड सर यांचे फार मोठे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी श्री मनोहर बारस्कर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिर कालावधीत ग्राम विकास विद्यालय कोंढी, महिला समाज विद्यालय भंडारा, जकातदार विद्यालय भंडारा यांचे विशेष सहकार्य लाभले . शेवटी विज्ञान भारती विदर्भ प्रदेश व विज्ञान भारती भंडारा युनिट तर्फे श्री संजय आयलवार यांनी उपस्थित अतिथी तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा ,शिबिरा करता सहाय्य करणारे संस्था व सर्व सन्माननीय यांचे आभार व्यक्त केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1