शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी – प्रा.डॉ. माधव हळदेकर

Spread the love

बिलोली (प्रतिनिधी):
कुंडलवाडी येथील कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलींचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२४ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयोजित या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.माधव हळदेकर यांनी “विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट, तथागत गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद अशा विविध महापुरुषांचे चरित्र वाचावेत, कारण एका महापुरुषांच्या जीवन चरित्र वाचनातून विद्यार्थी जीवनात विलक्षण अशी अफाट क्रांती घडून येऊ शकते असे मत व्यक्त यावेळी केले. यापुढे प्रा.डॉ. हळदेकर यांनी गुरुपौर्णिमा आणि गुरुचे महत्त्व स्पष्ट करताना संत कबीर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्य पंक्ती स्पष्ट करीत
विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यास आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे मत मांडले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून शाळेचे शिक्षक राजेश जायेवार हे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साध्वी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख रविकांत शिंदे यांनी केले त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धेत विशेष प्राविण्य पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सम्मान करण्यात आला.
याप्रसंगी शंकर पवार,साईनाथ बाभळीकर, माधव शिवपनोर, श्रीनिवास गोविंदलवार, डॉ.महेश कोंडावार, योगेश कंदुरके, दत्तात्रय अर्धापुरे, आकाश अर्जुने, आनंद कवडेकर, सुरेखा चोंडेकर, वर्षा ऐनगे, मेघा गोविंदलवार, शाम पवार यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close