क्राइम

NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर  लॉज मध्ये देऊन बलात्कार 

Spread the love

चित्रफीत बनवून व्हायरल करण्याची धमकी देत १० ते १२ वेळा बलात्कार 

तो व्हिडिओ तिच्या पालकांना देखील पाठवला

बीड / नवप्रहार डेस्क 

                     NEET ची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीला लोक वर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. यावेळी तरुणाने त्या क्षणाचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अंदाजे १० ते १२ वेळा तिची अब्रू लुटली. यानंतर त्याने तो व्हिडिओ तिच्या पालकांना देखील पाठवला. सध्या पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 9 महिन्यांपूर्वी जानेवारी 2024 मध्ये, NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ची तयारी करत असलेला 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. दरम्यान, सूरज गुंड नावाचा तरुण आला आणि त्याने विद्यार्थिनीला गाडीत बसवले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनी सूरज गुंडला आधीपासूनच ओळखत होती, दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली.

तिला गाडीत बसवल्यानंतर तरुणाने विद्यार्थिनीला केजपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या रेणापूर येथील हॉटेलमध्ये नेले. जिथे त्याने विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तरुणाने विद्यार्थिनीच्या छेडछाडीचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर त्याने तिला लातूर येथील वसतिगृहात सोडले. तेव्हापासून तो विद्यार्थिनीला वारंवार फोन करून तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर 10 ते 12 वेळा बलात्कार केला.

पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलापीडित विद्यार्थिनीने भीतीपोटी आणि कुटुंबाची बदनामी झाल्याने सर्व काही सहन केले. त्याचवेळी एके दिवशी सूरज गुंड यानेही विद्यार्थिनीचा व्हिडिओ तिच्या पालकांच्या फोनवर पाठवला. यानंतर पालकांनी विद्यार्थिनीला याबाबत विचारले असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी 11 सप्टेंबर रोजी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सूरज गुंड याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपी तरुणाला अटक करतील.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close