ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे कलाम – आंबेडकर होतो – नितीनजी कदम
गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकली वितरित करत दिला ‘मदतीचा हात’
प्रतिनिधी / अमरावती :
बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यामध्ये विदयार्थी, महीला, कामगार वर्ग अश्या विविध घटकांना दळणवळणा करिता मोठ्यप्रमाणावर ञास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे येथील खाजगी व प्रशासकीय वाहतूक व्यवस्था खोळंबली असल्याचा आरोप नेहमीचं येथिल नागरिक करीत आले आहेत. पांदन रस्ता असो वा पाणीप्रश्न अश्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असताना समाजसेवी नितीनजी कदम यांनी यासंदर्भात पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे. अश्यातच भातकुली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्याकरिता होणारी अडचण बघता नितीनजी कदम यांच्या नेतृत्वात दीपावलीच्या पावन महूर्तावर अनेक असंख्य शाळकरी गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आला. कुठलाही विद्यार्थी शिक्षणाअभावी वंचित राहू नये व हेच ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात कलाम – आंबेडकर घडतात अश्या आशयाचे प्रतिपादन यावेळी नितीनजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान केले. यापुढेंही विदयार्थी, महीला, वृद्ध, कामगार,शेतकरी, शेतमजूर, शोषित पीडित वर्गासाठी सातत्याने झटत राहण्याची ग्वाही नितीनजी यांनी दिली.यावेळी भातकुली ग्रामीण परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.