शैक्षणिक

घाटंजी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतला अंतरीक्ष महायात्रेचा अभुतपुर्व अनुभव

Spread the love

अनेक विद्यार्थ्यांनी केले आकाश गंगेवर प्रात्यक्षिक सादर

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील विद्यार्थ्यी व शिक्षक यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा न भूतो न भविष्य ते असा आकाशगंगा मार्गदर्शन पर कार्यक्रम घाटंजीत पार पडला.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती करून भावी यूवापिढी व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आत्मीयता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने भारतीय अंतराळ संशोधन संस्था,पंचायत समिती घाटंजी व शि.प्र.मं उच्च माध्यमिक शाळा घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा अर्थात स्पेस ऑन व्हील्स माध्यमातून विद्यार्थ्यांना आकाशगंगा व आकाशात होणाऱ्या तारे अगिनत तआरइमंडल हालचालीचे प्रात्यक्षिक एस पी एम गीलाणी महाविद्यालय येथे बसद्वारे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.या अभुतपुर्व कार्यक्रमाचे उद्घाटक गिलाणी महाविद्यालयाच्या संचालिका आलिया शहजाद मॅडम,अध्यक्ष मुख्याध्यापक फिरोज पठाण सर, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.एम.ए शहजाद,सुनील बोंडे विअशि, कन्या शाळा मुख्याध्यापिका सौ.संगीता मुनेश्वर,तसेच पर्यवेक्षक दीपक सपकाळ,मुख्याध्यापक,एस.पी.एम इंग्रजी माध्यम संजय ताजने, अनिता भोसले,केंद्रप्रमुख संजय तुरक,विशाल साबापुरे,रुपेश कावलकर यांची प्रामुख्याने
उपस्थित होती.या अभुतपुर्व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून इस्रोचे डॉ.कैलास वासेवार,सुरज नाटकर,विक्रांत ढोमणे,यश गोणाडे,तुषार शिंदे, कार्तिक चावजी यांनी विद्यार्थ्यांना बसमधील चंद्रयान,मंगलयान मोहीम,आकाशातील विविध ग्रह,तारे,उपग्रह प्रयोगाच्या माध्यमातून सादरीकरण करत मोलाचे मार्गदर्शन केले. इसरो बस विज्ञान प्रदर्शनीला तालुक्यातील जि.प,न.प,खाजगी शाळेतील शिक्षक,विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सुरुवात कालावधीत रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर्स स्पर्धा ही गटनिहाय पध्दतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेला प्रा.राहुल वानखडे, प्रा.आकाश राऊत सर यांनी परीक्षक म्हणून कामगिरी पारदर्शक पणे पार पाडली. रांगोळी स्पर्धा गट क्रमांक 1 मध्ये कु. श्रावणी विनोद राव नप शाळा क्र.5 घाटंजी, क्र 2 कु. शुभांगी दिलीप बावणे न प शाळा घाटी, कु.अमेरा नाज सैय्यद सलीम शि प्रमं विद्यालय,घाटंजी यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविला. गट क्रमांक 2 मध्ये वेदांत विजय निकम समर्थ विद्यालय घाटंजी,कु.रिया गजानन ठाकरे समर्थ विद्यालय घाटंजी,सुमित संजय चव्हाण शिप्रमं विद्यालय घाटंजी यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविला.पोस्टर स्पर्धा गट क्र1 मध्ये कु.वीरा राहुल राजकोल्हे शिप्रमं विद्यालय घाटंजी,प्रशित प्रशांत मालीकर शिप्रमं विद्यालय घाटंजी,कु. शुभांगी दिलीप बावणे नप शाळा क्र 2 घाटी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.गट क्र.2 मध्ये कु. हर्षिता समीर ठाकरे शिप्रमं विद्यालय घाटंजी, कु.नयना विनोद भुजाडे शिप्रमं विद्यालय घाटंजी,कु.माही ओमशंकर वैश्य शिप्रमं इंग्लिश मीडियम घाटंजी यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.सिद्धीका प्रशिकांत ढोकणे समर्थ विद्यालय घाटंजी,कु.माही रणधीर कावळे शिप्रमं विद्यालय घाटंजी, कु. आरती रामभाऊ शेंडे,शिप्रमं विद्यालय घाटंजी यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त केला. क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व सुत्रबध प्रास्ताविक प्रशांत उगले सर यांनी केले.आभार प्रदर्शन एम जे वाघाडे सर यांनी मानले.इस्रो बस विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी विज्ञान समन्वयक मानव लढे, एम आय बुरांडे ,एस के गोडे,एस एस नर्लावार,ए के अहिरकर,डी के मस्के,एस व्ही नखाते,व्ही आर ठाकरे,ए पी मानकर,एस के अहिरकर,राजेंद्र वातिले,कु.एम एम इंगोले व शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन केले.या आकाशगंगा कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देत सहकार्य केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close