श्री सुखदेवराव अभ्यंकर विद्यालयाची 86.20 निकालाची परंपरा कायम
अंजनगाव सुर्जी – (मनोहर मुरकुटे )
राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचालित हंतोडा ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती येथील
श्री सुखदेवराव अभ्यंकर विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
सुखदेवराव अभ्यंकर विद्यालयचा निकाल 86.20 टक्के लागला असून प्रथम श्रेया देवराव माहुलकर 90 % गुण द्वितीय ईश्वरी प्रमोद ढोले 89% तृतीय अमृता प्रभाकर मरसकोल्हे 77.20 % गुण प्राप्त केले . चतुर्थ क्र.सुहानी चंदू इंगळे 76% , पाचवा क्र. अनुराधा श्री. वानखडे , आचार बा. वानखडे 73% कृष्णा अ.गोळे 72.40% , आर्या सु कंकाळे 71.20% मिळवून यश संपादन केले प्राविण्यश्रेणी 5 प्रथम श्रेणी 10 द्वितीय श्रेणी 10 विद्यार्थी आले . राहुल व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर व सचिव क्षितिज म. अभ्यंकर व मुख्याध्यापक केतन खिरकर यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या . आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थी शिक्षक व आई-वडिलांना दिले .