विद्यार्थ्यांनी गिरवले लोकशाहीचे धडे
विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक झाली अटीतटीची
सुबोध हायस्कूलचा उपक्रम
अचलपूर प्रतिनिधी -किशोर बद्रटिये :- पाठ्यपुस्तकांमधून भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती अभ्यासक्रमात अंतर्भूत असते ही प्रक्रिया प्रत्यक्ष कशी राबविली जाते याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी अचलपूर येथील सुबोध हायस्कूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष निवडणूक लोकशाही पद्धतीने शनिवार रोजी घेण्यात आली .
देशात असलेल्या लोकशाहीची जाणीव विज्ञार्थी नां व्हावी व देशात निवडणुकी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या येणाऱ्या लोकशाही पद्धतीची माहिती बालवयातच विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता सुबोध हायस्कूलच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली . नामनिर्देशन पत्र भरणे , निवडणुक डिपॉजीट ,बॅलेट पेपर ,प्रचार ‘मतदान , मतमोजणी , नामनिर्देशन पत्र भरणे या सर्व गोष्टी प्रत्यक्ष या गोष्टीचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला . शनिवार रोजी पार पडलेल्या मतदाना विषई विद्यार्थी प्रतिनिधी ची निवडणुकीत विषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता . पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या मतदान प्रक्रिया भाग घेतला .18 विद्यार्थी उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र भरले होते . तीन विद्यार्थ्यांनी यात माघार घेतली होती .उमेदवारांनी आपला प्रचार करत विद्यार्थ्यांचे मतपरिवर्तन करून आपल्याला मत देण्याकरता प्रोत्साहित केले मीच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कसा चांगला आहे या प्रकारचे छोटे छोटे भाषण देखील वर्गा वर्गामध्ये जाऊन उमेदवारांनी दिले .टेबल , खुर्ची , पंखा बॅट टीव्ही छत्री चष्मा फळा आधी प्रकारच्या निवडणूक चिन्ह देण्यात आले होते नोटा चे देखील त्यात भाग आला होता .
प्रत्यक्ष निवडणुकीत पद्धतीनुसारच केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी , बोटाला शाही लावणे , झोनल अधिकारी यांचे शिक्षकांमधूनच निवडणूक करून मतदान घेण्यात येऊन या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मतदान केले मतदान झाल्यानंतर लगेच या निवडणुकीचा निकाल एका ठिकानी करण्यात आलेल्या हॉलमध्ये आला या निवडणुकीत मतमोजणी होऊन सर्वाधिक मते मुलींमधून कु . लावण्या शैलेश लोखंडे हिला मिळाली तर मुलांमधून देवाशीष सतीश अकोलकर याला द्वितीय क्रमांकाची मते मिळाली .तर कु .भाविका गणोरकर व कु . मृणाल तारे या विद्यार्थिनी देखील चांगले मते मिळाली .
या निवडणूक प्रक्रियेत मुख्याध्यापक संजय चौबे पर्यवेक्षिका सौ रश्मी पितळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात आयोजक योगेश अमृतकर व अर्चना अविनाशे , होते . या निवडणुकीसाठी सौ निता भारतीय मॅडम सौ .अनुराधा देशपांडे मॅडम जुनगरे मॅडम जोशी मॅडम शेवाने मॅडम सौ. निमा लोखंडे मॅडम हरीश फुटनाईक सर भारत बुंदिले सर मंदार भारतीय सर आधी शिक्षकांनी परीश्रम घेतले . विजय विद्यार्थी विद्यार्थिनीचे मुख्याध्यापक संजय चौबे व पर्यवेक्षिका पितळे मॅडम यांनी अभिनंदन केले .