न प च्या मनमानी कारभाराविरोधात संतोष गोलाईत ह्यांची जिल्हाधिकारी यांचे कडे आत्महतेची मागणी
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
तक्रार कर्ते संतोष गोलाईत ह्याचे नगर परिषद अंजनगाव सुर्जीच्या आठवडी बाजार श्री संत रुपलाल महाराज मार्केट मध्ये दुकान गाळे क्र 6 असून सदरचे मार्केट मध्ये कोणतीही सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसतांना कोणतीही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही , नालीची व्यवस्था नसतांना सण 2013,14 पर्यंत नालीटॅक्स नसतांना सण 2014,15 पासून अनुचित प्रकारे नाली कर लावण्यात आला तसेच महाराष्ट्र अधिनियम 1965 चे कलम 105 चा गैरवापर व गैर अर्थ काढून तक्रार कर्ते गोलाईत यांना मानसिक त्रास दिला त्यामुळे माझ्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत असल्याने सांबांधित अधिकार्यवर कार्यवाही करावी तसेच चालू वर्षा चे घर भाडेपावतीवर 24 टक्के व्याज नियम बाह्य पद्धतीने लावले आहे,, तसेच दुकानाचे गाळ्याचे झालेले फ्लोरिंगचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून दुकानांमध्ये झालेल्या पाणी गळती मुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अश्या अनेक तक्रारी बाबत व पठाणी वसुली करणाऱ्या कर निरीक्षक, व सांबांधित कर्मचार्यांवर कार्यवाही करावी अन्यथा मला आत्महत्या साठी परवानगी देण्यात यावी असे निवेदन तक्रार कर्ते संतोष गोलाईत ह्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ह्यांना दिले असून वरिष्ठ स्तरावरून काय कार्यवाही होणार ह्याकडे तक्रार कर्त्याचे लक्ष लागले आहे