सामाजिक
मौदा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.
मौदा प्रतिनिधि..
मौदा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसलापुर येथे आज एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मौदा केसलापुर फाटा येथे अंदाजे 50 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह असल्याने तो पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी साठी त्याला नागपूर येथे रुग्णालयात नेण्यात आले. सध्या मृतदेहाची ओळख पटली नसून हा नेमका मृतु कशाने झाला याची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक विजयसिंग ठाकुर. पोलिस कॉन्स्टेबल सचिन हटवार करीत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1