सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात अजूनही कार्यवाही का नाही ? – चेतन राजहंस, रा.प्र.सनातन संस्था
सनातन धर्म नष्ट करण्याचे षडयंत्र !
यवतमाळ -/ अरविंद वानखडे
तामीळनाडूतील द्रमुक या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून ते थांबले नाहीत, तर सनातन धर्म नष्टचं करून टाकण्याची इच्छाही त्यांनी जाहीरपणे मांडली. सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वा न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ होते. तरीही महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी ‘उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा असून या धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा,’ अशी पोस्ट फेसबुकद्वारे केली. महाराष्ट्रातील नास्तिकतावाद्यांच्या हत्येचा संबंध धार्मिक संस्थांशी जोडून निरपराध्यांना अडकविण्याचे कारस्थान रचणाऱ्यांमध्ये निखील वागळे अग्रणी होते. सहिष्णुतेची प्रवचने झोडून अॅवॉर्ड वापसी करणाऱ्या संधीसाधू साहित्यीकांच्या टोळीचे ते भक्त आहेत. ही अॅवॉर्ड’ वापसी टोळी उदयनिधी स्टॅलीनच्या विधानावर चकार शब्द काढायला तयार नाही. धर्म नष्ट होऊ शकत नाही, हे सनातन सत्य आहे. धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. ते केमिस्ट भवन, यवतमाळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सनातन धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन २७ सप्टेंबर ला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे.
दि.१२ ऑक्टोबर २०२३ ला सायंकाळी ६ वाजता महेश भवन, यवतमाळ येथे, तसेच दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ला सायंकाळी ६ वाजता एस. बी. हॉल, वरोरा रोड, वणी येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत बैठकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, जिल्हा समन्वयक प्रफुल्ल टोंगे यांनी संबोधित केले.