सामाजिक

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद ,( ता. ७-८-२०२३) :- *योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन व ऑफलाईन योगासन स्पर्धा- 2023 चे आयोजन करण्यात येत आहे.*
*महाराष्ट्रातील सर्व योगपटू व खेळाडूंसाठी ही एक आनंदाची बातमी असून त्यांना खेळण्यासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघाने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. सन 2020 मधे भारत सरकारने योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारात केला आहे. तसेच महाराष्ट्र शासन देखील योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त खेळाडू व योगपटूंनी या सुवर्ण संधींचा लाभ घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, महायोगोत्सव समितीचे राज्याध्यक्ष विनायक बारापात्रे, स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष लता होलगरे तसेच राज्य उपाध्यक्ष तथा योग क्रीडा समिती व स्पर्धा प्रमुख राहुल (अंबादास) बी. येवला यांनी केले आहे.*
*ही स्पर्धा फक्त पारंपरिक योगा प्रकारात (ट्रेडिशनल योगा) घेतली जाणार आहे. यात उपांत्य फेरी हि ऑनलाईन पध्द्तीने होईल तर अंतिम फेरी हि नागपूर येथे ऑफलाईन घेतली जाणार आहे. या स्पर्धेत स्पर्धक खेळाडूंसाठी वयोगट पुढील प्रमाणे आहेत. 1) मुले व मूली :वय 7 ते 15, २) मुले व मूली: वय 16 ते 25, ३) पुरुष व महिला : वय 26 ते 40, आणि ४) पुरुष व महिला : वय वर्षे 41 च्या पुढे.*
*स्पर्धेचे रेजिस्ट्रेशन दि. 20 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु असेल. स्पर्धेची उपांत्य फेरी ऑनलाइन पद्धतीने रविवार, दि. 17 सप्टेंबर 2023 ला होणार आहे. तसेच स्पर्धेची अंतिम फेरी ऑफलाइन पद्धतीने महायोगोत्सव, नागपूर येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.*
*बक्षीसांचे स्वरूप*
*अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येक गटातील प्रथम’ द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ विजेता खेळाडूंना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे.*
*तरी खेळाडूंनी अधिक माहितीसाठी राज्य स्पर्धा समिती सदस्य श्री. नितीन खैरनार 9890430574, सौ.आरुषी शिंगोटे 9922417482, श्री. मंदार भागवत 7720052527 सौ. अर्चना कवठेकर 9403572001 स्पर्धा प्रमुख श्री. राहुल बी. येवला 7385216951 तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष शरद बजाज,मो.नं 9405946247 व महासचिव मायाताई काळेकर मो.नं. 9689322765 यांच्याशी संपर्क साधावा.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close