यवतमाळ येथे राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे आयोजन
यवतमाळ / अरविंद वानखडे
साहित्य संस्कृती अकादमी तर्फे यवतमाळ येथे घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता, शोभादेवी जाधव मंगल कार्यालय आर्मी रोड यवतमाळ येथे भव्य स्वरूपात उद्घाटन होणार आहे
दिनांक सहा व सात जानेवारी 2024 रोजी आयोजित या राज्यस्तरीय वैचारिक साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद कवी संमेलन, गझल मुशायरा व्याख्याने, प्रकट मुलाखत व सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा भरगच्च वैचारिक मेजवानी श्रोत्यांना मिळणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दिग्गज साहित्यिकांना व त्यांना व कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. दिल्लीचे सुप्रसिद्ध पत्रकार झुंजार वक्ते श्री अशोकराव वानखडे यांची जाहीर व्याख्यान व मुंबईच्या निर्भीड पत्रकार आणि कार्यकर्त्या राही भिडे यांची प्रकट मुलाखत या संमेलनाची मुख्य आकर्षाने असणार आहेत. भाव समृद्ध कथाकथन सादर करण्याकरिता राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य माननीय श्री विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध कथाकार श्री नरेंद्र माहूर तळे, डॉक्टर अनंतसिंह ठाकूर कल्पना नरांजे व विनोद तीर मारे यांना निमंत्रित करण्यात आले. तर कवी संमेलनात महाराष्ट्राचे लाडके कवी रमजान मुल्ला ( सांगली) आबासाहेब पाटील ( बेळगाव ) यांच्यासह भरत दौंडकर, इरफान शेख प्रसेनजीत गायकवाड प्रदीप देशमुख किशोर मुगल, इत्यादी नामवंत कवी प्रा. डॉ. शोभा रोकडे यांच्या कविता सादर करणार आहेत. तर श्री डी. बी. जगतपुरिया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात प्रा. डॉ जगदीश कदम नांदेड, प्रा. माधव सरकुंडे यवतमाळ व प्राध्यापक सुषमा पाखरे वर्धा हे नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत.
मंगलाताई माळवे यांच्या नियोजनात दणदणीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. मनाला खुराक, मेंदूला चालना भावनांना बळ आणि विचारांना वळण ही संमेलनाची निष्पत्ती असेल. सागर संविधानाचा लोकशाहीचा हक्क आणि करतोव्यांचा व मानवतेचा हे या संमेलनाचे ब्रीद असेल संमेलनाचे निमंत्रक व प्रवक्ते प्रा. अंकुश वाकडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या साहित्य संमेलनाचा यवतमाळ शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान संमेलनाचे संयोजक अध्यक्ष प्रा. डॉ बाळकृष्ण सरकटे सर, कार्याध्यक्ष प्रमोद बाविस्कर, व उपाध्यक्ष सौ कल्पना मोटाळे वप्रा धरणे यांनी केले.