राजकिय
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ; अजित पवार शिंदे- फडणवीस सरकार मध्ये शामिल

पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकण्याचे दादा चे संकेत
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप झाला असून अजित दादा 40 आमदाराना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये शामिल झाले आहेत. अजित दादा यांनी उपमुखमंत्री पदाची आणि त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांपैकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील नागरिकांन जोरका झटका धिरे लागला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सामान्य जनतेला सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजेस वर विश्वास बसत नव्हता. पण टीव्ही उघडल्यावर मात्र त्यांचा नाईलाज झाला.
या घडामोडी संदर्भात नेहमी प्रमाणे आम्ही करतो ते योग्य करतो या अविर्भवात वावरणारे राजकीय पुढारी यावर आपल्या परीने भाष्य करून मोकळे झाले आहेत.
राज्याच्या विकासाला फायदा – मुख्यमंत्री शिंदे
या घटनाक्रमावर भाष्य करतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अजित दादांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा मिळेल. सध्या हे सरकार एक्सप्रेस च्या वेगाने काम करीत होते. आता या सरकारला अजित दादाच्या रुपात एक्सिलेटर मिळाला आहे. आता हे सरकार बुलेट ट्रेन च्या स्पीड ने विकास साधेल.
मोदी सरकारच्या विकासावर विश्वास ठेवून निर्णय – अजित पवार – आपल्या समर्थकांसह राज्य सरकारचा भाग झालेल्या आणि सरकार मध्ये उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार ने शपथ विधी नंतर लगेच पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की आम्ही मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि त्यांच्या कामावर भारावून सरकार मध्ये येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. आणि देशातील जनतेच्या फायद्यासाठी कठीण निर्णय घेणे महत्वाचे झाले होते. मोदी एक शक्तीवान नेता आहेत. अन्य देश सुद्धा त्यांच्या कार्याची प्रसंशा करतात.
आजचा प्रकार इतरांसाठी नवा असेल माझ्या साठी नाही – शरद पवार – राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा आणि अजित दादा यांचे काका शरद पवार यांनी देखील या घटनेनंतर लगेच घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या साठी हा विषय नवीन नाही असे म्हटले. जे आमदार पक्ष सोडून गेलेत त्यापैकी 80 % आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या 2- 3 दिवसात चित्र स्पष्ट होईल . अजित पवार यांजी आमच्या सह्या घेतल्या असे अजित पवार सोबत गेलेल्या आमदारांचे म्हणणे आहे. अजित ने विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला या बद्दल मला माहिती नाही . माझा आजही राज्याच्या जनतेवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. मी कराड ला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहो. आणि त्यानंर पुढील रणनीती ठरवू
सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय छगन भुजबळ – हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे. मोडींच्या विकासात्मक दृष्टिकोन आणि त्यांची कार्यशैली पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारचा भाग असलो तरी जनतेचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असो व अन्य कुठला आम्ही तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू .
सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह सरकार – सुधीर मुनगंटीवार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सरकारला सुपर फास्ट सरकार अशी उपमा दिली आहे. त्यांच्या मते शिंदे म्हणजे सुपर , फडणवीस म्हणजे फास्ट आणि अजित दादा म्हणजे प्रोग्रेस त्यामुळे हे सरकार सुपर फास्ट प्रेग्रेसिव्ह सरकार आहे.