सामाजिक

अनिल सहाने प्रोडक्शन व सिनेएनएक्स म्युझिक मराठी द्वारा निर्मित ‘मन हरविले माझे’ गाण्याचे लाँचिंग अड्याळची साक्षी मेश्राम मुख्य भुमिकेत

Spread the love

 

भंडारा / हंसराज

अनिल सहाने प्रोडक्शन व सिनेएनएक्स म्युझिक मराठी द्वारा निर्मित ‘मन हरविले माझे’ या

रोमांचक गाण्यात आजच्या तरुणाईला भुरळ घालावी असे गाणे फिल्म डायरेक्टर, गीत, संगीत आणि दिग्दर्शन अनिल सहाने (मुंबई) यांनी सादर केले आहे. गेल्या 10 वर्षांपासून विदर्भातील कलाकारांना नागपूरात संधी मिळावी व नागपुरात फिल्म सिटी व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींकडे जवळ जवळ कित्येक वेळा त्यांनी मागणी रेटून धरली. अनिल सहाने यांनी नागपूरातील ख्यातप्राप्त कॉलेज असलेले मोहता सॉयन्स कॉलेज परिसरात ‘मन हरविले माझे’ या गाण्याचे शुटिंग करण्यात आले. त्यावेळी अडयाळची साक्षी मेश्राम व प्रतिक्षा मेश्राम, सह विदर्भातील बरेच नवोदित कलाकार सहभागी होते. ‘मन हरविले माझे’ या गाण्यातून साक्षी मेश्रामची भूमिका युवादिलावर नक्कीच राज करेल असे अनिल सहाने म्हणाले. यावेळी साक्षी मेश्राम म्हणाली की, अनिल सहाने सरानी मला बारिक-सारीक टिप्स देऊन व भरपूर प्रॅक्टिस करून घेतली त्यामुळे ‘मन हरविले माझे’ या गाण्याची शूटिंग करताना फार आनंद झाला. तसेच हे गाणे निश्चित कॉलेज युवकांमध्ये हिट होऊन एक आगळी वेगळी छाप पाडेल अशी आशा आहे.

‘मन हरविले माझे’ या गाण्याच्या रिलीजप्रसंगी अनिल सहाने म्हणाले की, सर्व कलाकारांनी आपआपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली, त्यामुळे या गाण्याचे बोल, अॅक्ट व इम्प्रेशन आणि मोहता सायन्सचा कॉलेजचा आकर्षक परिसर, वातावरण निश्चितच प्रेक्षकांचा पसंतीची दाद देईल यात शंकाच नाही.

‘मन हरविले माझे’ हे गाणे गायिका अंकिता टाकाले यांनी सूरबद्ध केले असून गीत-संगीत आणि दिग्दर्शन अनिल सहाने यांचे आहे. डॉन्स कोरीयोग्राफर राशी गजभिये, मुख्य भूमिकेत साक्षी मेश्राम, प्रतिक्षा मेश्राम, सहायक कलाकार उन्नती महाजन, फाल्गुनी बडनाग, प्रज्ञा रामटेके, कन्हैयालाल मुरमु यांच्यासह विदर्भातील अनेक कलावंतांचा सहभाग असून आहे. नागपूर येथील श्री. माथुरादास मोहत्ता कॉलेज ऑफ सायन्स येथे झालेल्या शुटींगप्रसंगी कॅमेरा मॅन दिनेश सहाने व मॅनेजमेंट रसिका श्रीवास, मेकअप आर्टिस्ट नकुल श्रीवास उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close