एस.टी महामंडळाची बस रोखल्याने प्रवाशांचे हाल . अधिकाऱ्याची आठमुठी भुमिका ; प्रवासी संतापले .

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – एस टी महामंडळाची बस तिकिट तपासणी साठी आडमुठे पणाने पाऊण तास रोखल्याने प्रवाश्यांनी प्रवासी संतापल्याची घटना टाकळी ढोकेश्वर येथे घडली .
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे कल्याण आगाराची कल्याण , आळेफाटा , नगर , औरंगाबाद , जालना, खामगाव मार्गे अकोले येथे जाणारी बस टाकळी ढोकेश्वर बस थांब्यावर सकाळी सव्वानऊच्या सुमारास आली असता, नगर विभागाचे तिकीट तपासणी अधिकारी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने प्रवाशांचे तिकीट तपासणी सुरू केली, मात्र बस मध्ये एक प्रवासी विनातिकीट आढळला, तर बसच्या वाहकाकडे २४० रुपये जादा पैसे आढळले . अधिकाऱ्यांनी पंचनाम्या ची कार्यवाही सुरू केली, मात्र या सगळया प्रक्रियेला तब्बल पाऊन तास लागल्याने बस जागावर उभीच होती . सकाळी नगरला जाणाऱ्या चाकरमान्य महिला प्रवाशी ताटकळत उभे होते , मात्र अधिकारी बस सोडायला तयार नव्हते, प्रवाशांचा पाऊन तासाच्या प्रतिक्षेनंतर संयम ढळला आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याने बस नगर कडे मार्गस्थ झाली, मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठे पणामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला .
बस उभी करून तपासणी करणे नियम बाह्य –
एसटी बस मधील आर्थिक तपासणी व विनातिकीट प्रवाशी तपासणी करून कारवाई करणे, हा एस.टी बसच्या कामाकाजाचा एक भाग आहे , मात्र बसची तपासणी पाच मिनिटात करून प्रवांशाच्या वेळेचा अपव्यय न करता बस मार्गस्थ करणे, अवश्य आहे , असा नियम आहे . मात्र नगर विभागाचे अधिकारी हुकुमशाही पद्धतीने बस आडवून प्रवाशी व कर्मचारी यांना वेठीस धरून काम करतात . त्यांना समज मिळावी , अशी प्रवाशांची अपेक्षा आहे . ] [ चौकट –
अधिकाऱ्यांना पंचनामा लिहता येईना –
सदर बसची तपासणी झाल्यानंतर पंचनामा कारवाई सुरू झाली . संबंधीत अधिकाऱ्याला पंचनामा शुद्ध लेखनच कळेना आणि पंचनामा करता येईना . त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन झाले व यांना कोणी अधिकारी केले, असा संतप्त सवाल प्रवांशानी यावेळी उपस्थित केला . ]
त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करणार –
प्रवाशांची तिकीट तपासणी करताना बस मध्ये जाऊन चालू बस मध्ये तपासणी करावी , असा नियम असताना टाकळी ढोकेश्वर येथे तब्बल पाऊन तास बस थांबवून कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला . ]