सामाजिक

श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी लंके ,तर उपाध्यक्ष पदी कवाद व सचिव कळसकर .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ विश्वस्त शांताराम मामा लंके , उपाध्यक्ष पदी वसंतराव कवाद , तर सचिव पदी मावळते सचिव शांताराम कवाद यांची मुख्य निवडणूक अधिकारी व मावळते कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध पणे निवड करण्यात आली .
श्रा मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तां ची नुकतीच निवडणूक घेण्यात आली , त्यात श्री मळगंगा पॅनेलचे पुर्ण बहुमताने २१ पैकी २० जागा निवडून आल्यान आल्याने अपेक्षेप्रमाणेच अध्यक्षपदी ज्येष्ठ विश्वस्त व मावळते उपकार्याध्यक्ष असलेले कन्हैय्या उदयोग समूहाचे अध्यक्ष शांताराम मामा लंके , उपाध्यक्ष पदी बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद सर , सचिव पदी मावळते सचिव म्हणून काम पाहिलेले शांताराम कळसकर , कोषाध्यक्ष पदी प्रसिद्ध उद्योजक अमृता रसाळ , सह सचिवपदी खा . निलेश लंके यांचे खंद्दे समर्थ विश्वास शेटे , संघटक पदी प्रसिद्ध व्यापारी रामदास वरखडे यांची बिनविरोध पणे निवड करण्यात आली .
मुख्य निवडणूक अधिकारी प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळी त झालेल्या बैठकीत या सर्व निवडी बिनविरोध पणे करण्यात आल्या . या देवस्थान ट्रस्टच्या निवडणूकी साठी १ लाख २२ हजार रुपये खर्च आला , पण हा खर्च देवस्थान ट्रस्टच्या तिजोरीवर बोजा पडू नये, म्हणून नूतन विश्वस्तांनी १ लाख २५ हजार रुपये तिजोरी त जमा केल्याने निघोज परिसरातून कौतूक करण्यात येत आहे .
या बैठकीला नूतन विश्वस्त माजी सरपंच ठकाराम लंके , विठ्ठलराव कवाद , अनिलराव शेटे , ॲड . ज्ञानेश्वर लामखडे , बबनराव ससाणे , बाळासाहेब लंके , संतोष रसाळ , अनिल लंके , मंगेश वराळ , रोहिदास लामखडे , शंकर लामखडे , लक्ष्मण ढवळे , अशोक वरखडे ,मोहिनी वरखडे , सिमा वराळ उपस्थित होते , या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close