मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
यादीत सुधारणा करण्यासाठी संधी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन
मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण २० जुलैपूर्वी घेण्यात येईल.
अमरावती : कैलास कुलट — भारत निवडणूक
आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी दुबार नोंदणी, मयत मतदार व स्थलांतरित मतदार यांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना देऊन यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी बुधवारी येथे केले.
निवडणूक आयोगाच्यानिर्देशानुसार १ जानेवारी २०२४
या तारखेपर्यंत संक्षिप्त पुनरीक्षणकार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पूर्व उपक्रमात त्यानुसारमतगणी अधिकारी सहायकदुबार मतदार, स्थलांतरित मतदार व मयत मतदारांची १००टक्के वगळणी करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीयअधिकाऱ्यांना माहिती द्यावी. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, या अनुषंगाने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे
आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.