राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष बाह्य संपर्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
१४गरोदर माता व बाह्य इतर १२रुग्णांचा तपासणी शिबिरात सहभाग.
भद्रावती / नवप्रहार मीडिया
नगर परिषद भद्रावती राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र भद्रावती .विशेष बाह्य संपर्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २डिसेंबर २०२३ रोज शनिवारला सकाळी १०ते १२ वाजेपर्यंत सदर वेळेत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन नागरी आरोग्यवर्धनी केंद्र स्थळ हनुमान नगर भद्रावती येथे आयोजित करण्यात आले होते. या तपासणी शिबिरात एकूण १४ गरोदर माता व बारा बाह्य इतर रुग्ण यांची तपासणी करण्यात येऊन गरोदर माता यांना इतर प्रोटीन खाद्य पुरवठा व औषधी उपलब्ध करण्यात आली. स्त्री रोग तज्ञ डॉ. मांडवकर, सहा .डॉ. विनय कुंभारे, डॉ . दीप्ती मोहितकर आदींनी पेशंटची तपासणी करीत योग्य दिशादर्शक आरोग्यदायी मार्गदर्शन केले . प्रसंगी आरोग्य कर्मचारी शितल चौधरी, शाहिद खान, एम .पी. खान, आशा .स्वयंसेविका प्रगती पेद्दीवार, ममता पिदूरकर ,स्वाती दैवलकर, संध्या डे आदींनी सदर तपासणी शिबिरात कर्तव्य तत्परता दाखवत रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवत आनंददायी वातावरण निर्मिती करीत मोलाचे कामगिरी बजावली.