सामाजिक

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन 

Spread the love

धामणगाव रेल्वे, / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धामणगाव शाखेचा विजयादशमी उत्सव आज शनिवार दि.१९ ऑक्टोबर २०२४ ला सायंकाळी ६.०० वा आयोजित करण्यात आला आहे यापूर्वी शहरातून स्वयंसेवकांचे पथसंचलन सुद्धा निघणार आहे
डॉक्टर हेडगेवार नगर परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या नगरपरिषद च्या पटांगण येथे संघाचा श्री विजयादशमी उत्सव संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रगेश बनसोड तर प्रमुख वक्ता म्हणून संघाचे प्रांत सह शारीरिक प्रमुख पंजाबराव अव्हाळे , अकोला उपस्थित राहणार आहेत
धामणगाव नगर व परिसरातील संघप्रेमी मंडळींनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धामणगाव नगर कार्यवाह चेतन जयप्रकाश पोळ यांनी केली आहे याप्रसंगी आजच गणवेश धारी स्वयंसेवकांचे पथसंंचलन दुपारी ४.३० वाजता शिवाजी संघ स्थानावरून निघणार आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close