सामाजिक
चांदुर रेल्वे शहरातील मतदारांसाठी विशेष शिबिर
चांदुर रेल्वे / प्रतिनिधी
चांदुर रेल्वे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना सुचित करण्यात येते की आपले मतदार यादी मधील नाव दुरुस्त करणे पत्ता बदल करणे इत्यादी कामांसाठी शासनातर्फे *दिनांक १० सप्टेंबर, रविवार रोजी जिल्हा परिषद शाळेत सकाळी १० ते साय ६ पर्यंत* विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी ज्या मतदारांना मतदार यादी मध्ये आपल्या नावाची दुरुस्ती करायची आहे किंवा आपला पत्ता बदल करून नजीकच्या मतदान केंद्रावर आपले नाव स्थानांतरित करायचे आहे त्यांनी या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा.
आवश्यक अर्ज करण्यासाठी *आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, इलेक्ट्रिक बिल/ बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे व एक पासपोर्ट साईज फोटो* सोबत आणावे. अशी विनंती काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1