क्राइम

पर्यटक म्हणून आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार 

Spread the love
 
स्वतःच बाईक चालवत आली रुग्णालयात
 

नवी दिल्ली  / नवप्रहार  मीडिया 

           एकिकडे देशाचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि संशोधक व इतर लोक प्रयत्न करीत आहेत .तर दुसरीकडे पर्यटक म्हणून येथे आलेल्या एका स्पॅनिश महिलेवर आठ  ते दहा लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे या नंतरही ती महिला स्वतः बाईक चालवत रुग्णालयात दाखल झाली. हा प्रकार झारखंडच्या हंसडीहा पोलीस ठाणे क्षेत्र कुरुमाहाट येथील आहे
 

 पीडित महिला स्पेनची राहणारी आहे. महिला फिरण्यासाठी म्हणून दुमका येथे आली होती. शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे. महिलेसोबत तिचा पती सुद्धा होता. ते बाईकवरुन भागलपूरला चालले होते. त्यावेळी टेंट लावून ते रस्त्यात थांबले होते.

परदेशातून हे पती-पत्नी टूरिस्ट वीजावर भारतात आले होते. हे जोडप भारतात येण्याआधी पाकिस्तानात गेलं होतं. पाकिस्तानातून बांग्लादेश आणि तिथून झारखंड दुमका येथे पोहोचले होते. दुमका हंसडीहा पोलीस ठाणे क्षेत्र कुंजी गावात तंबू टाकून हे जोडप थांबलं होतं.

ही अत्यंत लाजिरवाणी बाब

झारखंडवरुन ही स्पॅनिश महिला नेपाळला जाणार होती. महिला तंबूमध्ये असताना आठ ते दहा लोक तिथे आले. त्यांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. पीडित महिला पतीसोबत बाइकवरुन दुमका येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचली. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन एसपी पितांबर सिंह खेरवार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. परदेशी महिलेसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा झारखंडच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याच भाजपाने म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close