भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी
वाशीम / प्रतिनिधी
सरकारच्या सातत्यपूर्ण शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ *भूमिपुत्र शेतकरी* संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात 31 डिसेंबर 23 ते 1 जानेवारी 2024 ला रिसोड ते जिल्हाअधिकारी कार्यालय वाशिम पर्यंत पन्नास कि.मी. ची पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे ठिक- ठिकाणी स्वागत करण्यात आले. पदयात्री साठी रिसोड ते वाशिम रोडवरील सर्व गावामध्ये चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. पदयात्रेला सर्व पक्ष, गट व संघटनांकडून पाठींबा मिळाला व प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठींबा जाहीर केला. अनेक गावातील शेतकऱ्यांकडून मुठ- मुठ जमा झालेल्या सोयाबीनची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.
रिसोड मतदार संघाचे आमदार आमित झनक यांनी शेतकऱ्यांचा मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून पदयात्रेत एक कि.मी. पायी प्रवास करीत पदयात्रेस पाठिंबा दिला. गजानन पाचरणे, जि.प. सभापती वैभव सरनाईक यांनीही पदयात्रेत चालुन पाठींबा दिला. रिसोड बाजार समीतीचे सभापती संजय शिंदे, उपसभापती राजु आरू, रवींद्र चोपडे, भगवान गाडे, धन॓जय बोरकर पुर्ण वेळ पदयात्रेत सहभागी होते. पदयात्रेचा मुक्काम रिठद येथे होता. रिठद येथे संत गजानन महाराज मंदिर संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भव्य जाहीर सभा झाली. सभेनंतर एक हजार लोकांच्या जेवनाची व निवासाची व्यवस्था रिठद येथील भूमिपुत्र चे कार्यकर्ते व गावकर्यांनी केली. पदयात्रेस पंचायती महानिर्वाणी आखाडय़ाचे मंहत रमेश गीर महाराज यांनी पदयात्रेचे स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे नेते दामुआणणा इंगोले यांनी पदयात्रेत चालुन भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष अक्रोश पदयात्रेचे संयोजक विष्णुपंत भुतेकर यांचे स्वागत कले. वाशिम शहरात पदयात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. पदयात्रेतील घोषणांनी शहर दनानुन सोडले, पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाला पोचल्यानंतर पदयात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
जाहीर सभेत संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी उत्पादन खर्च वसुल होत नसलेल्या सोयाबीनचा मुद्दा मांडत आसतानां सरकारने 2023 मधे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी 1 लाख 67 हजार मे. टन तेल आयात केल्या मुळे देशांतर्गत तेल उद्योग व शेतकऱ्यांवर प्रचंड संकट कोसळले आहे. तुर, कापुस यांचीही परीस्थी वेगळी नसल्याचे त्यांनी यावेळी विषद केले. यावेळी वाशिम- यवतमाळाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी पदयात्रेची दखल घेत भेट दिली व निवेदन घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक आसल्याचे सांगीतले. सभा संपल्यानंतर जिल्हाअधिकारी वाशिम यांना भूमिपुत्र च्या शिष्टमंडळाच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्य
1) सोयाबीनला *आठ हजार* रू. भाव द्या.
2) *कापसाला* दहा हजार भाव द्या
3) *तुर आयात* बंद करून तुरीचा हमी भाव दहा हजार करण्यात यावा
4) *कांदा* व *गव्हाची* निर्यात पुन्हा सुरू करण्यात यावी व भाव पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न करू नयेत.
5) *पीक विमा* अग्रीमसह नियमित पीक विम्याचा मोबदला द्यावा.
6) कृषी पंपाला *मोफत* व *मुबलक* विज पुरवठा द्यावा शेतकऱ्यांवर दाखल विज चोरीचे गुन्हे सरकार ने तात्काळ मागे घ्यावे
7)राज्यातील सर्व दुष्काळसदृश घोषित भागात सरसकट मदत द्यावी.
यावेळी जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवचार, आर. बी. खडसे, बाबाराव ढोणे, कारंजा तालुकाध्यक्ष देवेंद्र लांडकर, डाॅ. तृप्ती गवळी, शंकरराव देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमला डाॅ. जितेंद्र गवळी, गजानन अमदाबादकर, विश्वनाथ शेवाळे, अरूण सुरोशे, संजय शिंदे सभापती, रविंद्र चोपडे , राजु आरू उपसभापती, बंडू हाडे प.स. सभापती, संगीताताई मार्गे, बालाजी बोरकर , सचिन काकडे, विकास झुंगरे,भगवान गाडे, केशव गरकळ, देव इंगोले, बालाजी गोटे,संजय सदार, गजानन जाधव, गजानन सदार, विठ्ठल आरू,बालाजी बोरकर, संतोष सुर्वे, श्रीरंग नागरे, विनोद घुगे, भगवान बोरकर, गजानन आरु, राहुल बोडखे,भुषण मुराळे, भास्करराव देशमुख, सचिन काकडे, रवि जाधव, संतोष ठाकूर, रवि बोरकर, विष्णु सरकटे, राजु डांगे, जालिंदर देवकर, जगन गरकळ, गोपाल भिसडे,रजनिष खोंडकर, प्रकाश तात्या चोपडे, डाॅ. दहीहंडे, प्यारेलाल नागरे,वैजनाथ रंजवे, संतोष गव्हाणे, डाॅ. सुभाष नागरे, पप्पु हेंद्रे, पवन खोंडकर, शंकरराव देशमुख, विनोद लढ्ढा, महाविर ठाकुर, पप्पु भुतेकर, राजु खांबलकर, रवि बोरकर, संतोष खरात, भागवत नरवाडे,बालाजी सोंळके, अर्जुनराव तुरूकमाने, बबनराव बोरकर, प्रकाश शिकारे, दिनकर बोरकर, सिताराम इगोले, शंकर हुबांड,मुरली गाडे, गोकुळ मंडलिक, नितीन गाडे,ग्यानदेव भुतेकर, दत्तराव इंगोले, वसंत डुबे, गजानन भुतेकर, गोरख भुतेकर, सुनील शिकारे, सीताराम लोखंडे, विजय बोरकर, डिगंबर इंगोले, कैलास पाटील, हिरामन खरात,सनिल पाटील यांच्यासह भूमिपुत्र चे कार्यकर्ते व
मनोहर महाराज अवचार व त्यांचा सर्व भजनी संच उपस्थित होता. पदयात्रेचे आयोजन वाशिम जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी केले होते.