सामाजिक

….अखेर सोनोग्राफीची मशीन झाली सुरू

Spread the love

.

कुबडेच्या आंदोलनाची यशस्वी पूर्णाहुती

हिंगणघाट / अब्बास खान

भर ४५ डिग्री तापमानात पायाला फोड येईपर्यंत रुग्णमित्र गजू कुबडे यांनी केलेल्या पश्चताप आंदोलनाची यशस्वी इतिश्री आज सोनोग्राफी मशीन विधिवत सुरू होऊन झाली.
आज सकाळी 11 वाजता रुग्णमित्र गजू कुबडे यांनी शब्द दिल्या प्रमाणे सोनोग्राफी मशीन सुरू झाली की नाही याची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली.यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ किशोर चाचरकर ,महिला स्त्री रोग तज्ञ डॉ.मीनाक्षी वावरे उपस्थित होत्या.
मागील दोन वर्षांपासून ही मशीन चालविणारा तज्ञ डॉक्टर नसल्याचे कारण देऊन बंद अवस्थेत शोभेची वस्तू म्हणून पडून होती.या बाबत रुग्णमित्र गजू कुबडे यांनी सरकार दरबारी अनेक अर्ज विनंती केल्या परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून गजू कुबडे यांनी 24 एप्रिलला रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने आंदोलन केल्या नंतर प्रशासन जागे झाले व सोनोग्राफी चालविण्यासाठी दोन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली.व हजारो गोरगरीब रुग्णांची सोय झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.तर अडीच तास रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने उभे राहिल्याने श्री कुबडे यांचे तळपाय पूर्णपणे सोलून निघालेले असून एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close