शेती विषयक

केळीला येणार सोनियाचे दिवस-फेब्रुवारी मध्ये केळी 33 रुपयाच्या पुढे जाण्याचा अंदाज – किरणभाऊ चव्हाण

Spread the love

अकोला / प्रतिनिधी

डिसेंबर जानेवारीपासून सुरू असलेल्या केळी दराच्या घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला होता.उत्पादन खर्च लागवड रोपांच्या किमती झालेली वाढ तसेच शासनाने केलेल्या रासायनिक खतांच्या किमती तील वाढ शेणखताच्या किम तीतही टेलरला झालेली वाढ वाढलेले मजुरीचे दर केळी वर असलेला खोडकीड करपा कुंकूम मोजक व्हाय रस सीएमव्ही सारख्या रोगाने फवारणी खर्चात झालेली वाढ हा खर्च पाहता केळी दर हा कायमस्वरूपी हमीभाव चोवीस रुपये तीस पैसे असायला हवा परंतु डिसेंबर पासून केळीचे दर हे थंडीत चिलीग मुळे कमी होऊन सत ते आठ रुपये कटिंग केला गेला. त्यामुळे उत्पादन आणि खर्च यामध्ये तफावत निर्माण होत गेली. केळी लागवडी कर शेतकरी दुरावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु आज शिरपूर तालुक्या मध्ये 2501 भाव मिळाला असून सण पाहता महाशिव रात्री, रमजान तसेच येणारा कुंभमेळ्यात केळीची प्रचंड मागणी वाढली आहे.तसेच देशातून निर्यात ही चांगल्या प्रमाणात होत असून पुढेही निर्यात चालू राहणार असुन केळी ही 33 रु च्या पुढे भाव शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या वेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी चौकशी करू नच मालाची कटिंग करावी असे आवाहन श्री.किरण भाऊ चव्हाण व राज्य संमवयक सचिन कोरडे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close