इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून तो निघाला होता जीव द्यायला पण …..
नोएडा / नवप्रहार डेस्क
काही लोक जीवन जगताना भविष्यात काय होईल याचा विचार करत नाही. तर काही लोक भविष्याच्या काळजीने आपले वर्तमान खराब करतात. काही लोक परिस्थितीला सामोरे न जाता अडचणींना घाबरून जीवन संपवण्याचा विचार करतात. अशीच घटना नोएडा येथील एका उच्चभ्रु सोसायटीत घडली आहे. या सोसायटीत राहणारा एक इसम इमारतीच्या 12 व्या मजल्या वरून उडी टाकण्याच्या तयारीत होता. पण
व्हायरल व्हिडिओमध्ये, नोएडातील सुपरटेक केप टाऊन सोसायटीच्या 12 व्या मजल्यावर एक व्यक्ती आपल्या मृत्यूची वाट पाहत असल्याचे दिसून येते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक व्यक्ती सोसायटीच्या 12 व्या मजल्यावरील टोकाशी उभा राहत असल्याचे दिसते. यावेळी या व्यक्तीने आपले संपूर्ण शरीर त्या मजल्याच्या बाहेर काढले असून तो फक्त आपल्या हाताचा आधार घेत तिथे थांबला होता. व्यक्ती आपला हाथ सोडत आपला जीव संपवण्याच्या विचारात होता मात्र तितक्यात भलतेच घडून बसते.
व्हिडिओमध्ये दिसणारे हे भयानक दृश्य समोरच्या अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे आणि जवळच्या लोकांना जाऊन मदत करण्यास सांगत आहे. सुरुवातीला सदर व्यक्तीने जीव संपवण्याच्या उद्देशाने इमारतीला लटकून घेतल्याचे समजते मात्र त्याचे परिणाम वाईट होणार असल्याचे समजल्याने तो हवेत लटकून मदतीची वाट पाहू लागला. यावेळी हा व्यक्ती मृत्यू आणि जीवन यांच्यात संघर्ष करताना दिसून आला. त्याची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यानंतर सोसायटीतील काही सदस्यांनी पळत येऊन या व्यक्तीला खेचत त्याचे प्राण वाचवले. या व्यक्तीला कशाचा तरी ताण आला त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेजाऱ्यांच्या बुद्धीमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.
मृत्यूच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सुपरटेक केपटाऊन सोसायटीमध्ये एका व्यक्तीने 12व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. काही लोक वेळेत पोहोचले आणि त्यांनी त्याला वाचवले’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे.
एका युजरने लिहिले आहे,”दात घासताना भाऊने त्या माणसाचा जीव वाचवला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या व्यक्तीने हा स्टंट फक्त लक्ष वेधण्यासाठी असे केले आहे”. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये व्यक्तीने आपला जॉब गमावल्याने जीव देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.