सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक अनिल डाहेलकर यांचा भारतीय जनता पार्टी मधे जाहिर पक्ष प्रवेश
हातगांव , हिरपुर , ब्रम्ही सह उनखेड येथिल युवा कार्यकर्त्यानी नोंदविला पक्ष प्रवेश
बाळासाहेब नेरकर कडुन
मुर्तिजापूर : येथिल सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक तथा नेहरु युवा मंडळाचे तालुकाध्यक्ष अनिल डाहेलकर यांचा आपल्या तालुक्यातील युवा मंडळांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश
गेल्या तिस वर्षापासुन नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातून सतत समाजिक कार्य करणारे अनिल डाहेलकर हे गेल्या दोन वर्षापासुन एका सामाजिक संस्थेत युवकांना रोजगार आणि युवकाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या त्या संस्थेच्या उद्देशाने प्रभावित होऊन जोडले होते .अनिल डाहेलकर यांची विचार धारा ही भारतीय जनता पार्टी शी जुळती असल्याने ते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचे सदैव समर्थक होते तर मुर्तिजापूर चे आमदार मा. हरिष भाऊ पिंपळे आणि आदरणीय कमलाकर भाऊ गावंडे जिल्हा भाजपाचे दिव्यांग सेलचे जिल्हा संयोजक बाळासाहेब नेरकर यांच्याशी जूळलेले. असल्याने भाजपा बरोबर आपले मत आपली भूमिका सांगुन ती मान्य केल्या ने तसेच मुर्तिजापूर एम आय डी सी मधे कंपन्या आणून मुर्तिजापूर तालुक्यातिल युवकांसाठी रोजगार निर्मिती च्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांच्या आश्वासनाने प्रवृत्त होऊन हा प्रवेश केल्याचा निश्चय नमुद केला. या पक्ष प्रवेश वेळी हिरपुर येथिल प्रविण पांडे यांनी ही पक्ष प्रवेश केला तर व्यावसायिक व्यस्ततेमुळे हातगांव स्वप्नील सातिंगे , आशिष गावंडे यांनी प्रवेश नोंदवला . यावेळी मा.आ हरिष भाऊ पिंपळे , सामाजिक कार्यकर्ते कमलाकर भाऊ गावंडे , जेष्ठ मार्गदर्शक रावसाहेब कांबे , युवा नेता हर्षल साबळे यांची उपस्थिती होती.
कैक वर्षापासुन मनातिल विकासाच्या संकल्पना मुर्तिजापूर तालुक्यातील जनतेला प्रशस्त सुसज्ज सर्व सुविधा युक्त विशाल रुग्णालय . खेळाडू निर्माण होऊन मुर्तिजापूर चे नाव विश्व स्तरावर जावे याकरीता युवां विशाल क्रीडांगण , मुर्तिजापूर हे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गाडगेबाबाची भूमी आहे . ईथे सातत्याने उपक्रम सामाजिक साहित्यिक कार्यक्रम होतच असतात त्या अनुषंगाने भव.असं सास्कृतिक भवन डिजिटल वाचनालय ,सार्वजनिक विरंगुळा गार्डन अशा अनेक संकल्पना येणाऱ्या युती सरकारच्या आणि मा.आमदार हरिष भाऊ पिंपळे यांच्या अथक प्रयत्नातून तसेच मा.कमलाकर भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनातून साकार करायच्या उद्देशाने हा प्रवेश तितकाच आत्मियतेचा वाटत असल्याचे मत अनिल डाहेलकर यांनी यावेळी व्यक्त केले.