गुलमोहर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर याची जयंती साजरी,
माऊली ग्रुप तर्फे प्रत्रकारांचा सत्कार, दैनिक निर्मल दिनदर्शिकेचे विमोचन.
नेर:- नवनाथ दरोई
पहिले मराठी दर्पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पत्रकार बाळशास्त्री जाभेकर यांच्या जयंती निमित्ताने नेर येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या गुलमोहर येथे माऊली ग्रुप च्या वतीने पत्रकाराच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली ग्रुपचे सचिव ज्ञानेश्वर माडूळकर हे मंचावर विराजमान होते.प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक निर्मल विदर्भाचे संपादक अरुण राऊत, नेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे,निलेश वंजारी, रोशन जीभकाटे,विशाल गोंडाणे हे मंचावर विराजमान होते. अध्यक्षाच्या शुभहस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. नंतर पत्रकार निलेश वाहने,प्रविन पाटमासे,राहुल मिसळे,प्रमोद दरोई,मोहन पापडकर,मनोज झोपाटे,संजय राऊत,राजेश धोटे,साहेबराव सावऴे,लक्ष्मण वानखडे,सतीश उरकुडे, विनोद कापसे, योगेश दरेकर, प्रफुल गायनर,अमृत वासनिक पाॅवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगतात पत्रकार असे म्हणाले की,वेळप्रसंगी सगळयानी एकत्र यायला पाहिजे. यावेऴी निर्मल विदर्भ दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता माऊली ग्रुपने अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वंजारी प्रास्ताविक गजानन काळे आभार निलेश वाहणे यांनी केले.