विदेश

युवकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित करणाऱ्या डॉक्टरला अटक

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

          मुस्लिम तरुणांना आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या डॉक्टरला NIA ( राष्ट्रीय तपास यंत्रणा ) ने अटक केली आहे. डॉ. अदनानली सरकार (वय ४३) असे त्याचे नाव आहे. कोंढव्यातील त्याच्या घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि आयसिस संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.महाराष्ट्रमधील इसिसच्या मॉड्युल प्रकरणात कोंढवा परिसरातून एका डॉक्टरला अटक केली आहे.

त्याच्यावर मुस्लिम तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करण्याची जबाबदारी होती. एनआयएला त्याच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून कारवाई करण्यात आली. पुण्यामधून आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचा तपास महाराष्ट्र एटीएस करीत आहे. त्यातच आता एनआयएनस कारवाई केल्यामुळे पुणे हे दहशतवादी आश्रयस्थान बनते आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close