मोर्चा घेऊन आलेल्या मनसेचा जिल्हाधिकारी यांच्या चेंबर समोर ठिय्या
स्थायी पट्टे मिळावे यासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बोरगाव मेघेच्या गिट्टी खदान परिसरातील नागरिकांना स्थायी पट्टे द्या
वर्धा / आशिष इझनकर
स्थायी पट्ट्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या मनसेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी चेंबर समोर ठिय्या मांडलाय. बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान परिसरातील नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढत नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहचलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी भेट न देताच कार्यालया बाहेर निघून गेल्याने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिन बाहेर ठिय्या मांडलाय. जोवर जिल्हाधिकारी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत नाही तोवर येथून हटणार नसल्याचा पवित्रा मनसेने घेतला आहेय. महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहे.