क्राइम

बजरंग दलाचे रवि गावंडे यांच्या वर प्राणघातक हल्ला

Spread the love

गोधन पकडुन दिल्याच्या सशंय गावात तनावपुर्ण शांतता

नव प्रहार : प्रतिनिधी – बाळासाहेब नेरकर

अकोला : हिवरखेड बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते रवि भाऊ गावंडे यांच्या वर प्राणघात हल्ला झाल्याची घटना 5 जुलै शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान कार्ला वेस परिसरात घडली जिव वाचवण्यासाठी घेतला फत्तेपुरी मदींरात धाव फोनवरुन बोलावले पोलीसला म्हनून पोलीस घटना स्थळी दिसताच मारेकर्‍यानी पळ काढला.या घटनेमुळे हिवरखेड येथे तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी या प्रकरणी तिघान विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करुन.शहरात ज्यादा पोलीस कुमक बोलावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग दलाचे रवींद्र उकर्डा गावडे रा. मराठा नगर (वय ४१) यानी दिलेल्या फिर्यादीत घटलेखी मी सकाळी १०.३० वाजता सुमारास कार्ला वेस फतेपुरी स्वस्थान मंदिरा जवळून जात असताना. गावातीलच फिरोज खाँ आझाद खाँ व त्यांच्या एका भाऊ तसेच रशीद खाँ यांच्या एक मुलगा या तिघांनी संगनमत करुन मला हटकून ‘ तूने हमारे बैलोकी जाणकारी पोलीस को दिया ‘ पहले तू हमसे एक बार बच ग्या असे म्हणून काठी ने जबर मारहाण केली शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली हिवरखेड पोलीसांनी फिरोज खाँ यांच्या सह तिघा विरुद्ध भारतीय न्याय सहिता १२७,(१)११८(१)१८९,३५२,३५१(२) कलमान्ये गुन्हे दाखल केले घटना घडल्या पासून आरोपी फरार झाले तर घटना स्थळाला SDPO अनमोल मित्तल यांनी भेट दिली. हिवरखेड शहरात तणावपूर्ण वातावरण असून दंगल नियंत्रण पथक दाखल करण्यात आले. अवैध धध्यांचे माहेर घर असलेल्या हिवरखेडला मध्यप्रदेशच्या सिमेवरून विमल गूटका चोरीचे गोधन ईतरही या पोलीस स्टेशन अतर्गत घडत असलेल्या अकुंशा वर जरब बसनार का असे गावात नागरिक बोलत आहेत आजच्या घटनेचा तपास तपास ठाणेदार गोविंद पांडव करीत आहेत. या घटने पूर्वी पोलीसांनी कत्तली साठी जाणारे ३ बैल ताब्यात घेतले होते.

या घटनेमूळे पोलीस स्टेशन आवारात सध्याकाळी शांतता समीतीची बैठक घेऊन ठानेदार पांडव यानी शांतता राखन्याचे आवाहन करीत गावातुन पोलीस रूट मार्च काढन्यात आला व मोक्याचे ठिकानी गस्त तैनात ठेवली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close