हटके

तो आजीचा हात घट्ट पकडून चालत होता, इतक्यात वाघ आला आणि त्याला उचलून घेऊन गेला

Spread the love
राजस्थान /. नवप्रहार ब्युरो
                येथील रणथंबोर अभयारण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे आजी सोबत तिचा हात पकडून जात असलेल्या सात वर्षीय बालकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. आणि त्या बालकांना उचलून घेऊन गेला. हा प्रकार लोकांच्या डोळ्यादेखत घडला. पण इतका अचानक घडला की त्यांच्या कडे ही घटना फक्त पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण ते काहीच करू शकत नव्हते.
                या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की , कार्तिक सुमन हा सात वर्षीय बालक आपल्या आजी सोबत रणथंबोर येथील अभयारण्यात देवदर्शनासाठी आला होता. त्याने काही तास याठिकाणी घालवले. तो अभयारण्य फिरला. त्याने काही प्राण्यांसोबत फोटो देखील काढले. त्याने येथील मंदिरात जाऊन दर्शन देखील घेतले. पण तो आजीचा हात पकडून जेव्हा जात होता. तेव्हाच एका झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. आणि त्याला उचलून झुडपात घेऊन गेला.
       .        लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर वनकर्मचारी तेथे आले. त्यांनी कार्तिक च्या मृतदेहाजवळ बसलेल्या वाघोबाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो तेथून जाण्यासाठी तयार नव्हता. शेवटी फटाके फोडून त्याला तेथून हुसकावून लावण्यात आले.
             महत्वाचे असे की याठिकाणी असलेल्या वाघाची येथील लोकांना भीती वाटत नसल्याचे  म्हटल्या जात आहे. कारण येथील लोकांसाठी या ठिकाणाहून ये जा करणे ही नित्याची बाब असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी अशी घटना घडली नसल्याने त्यांना वाघाचे अधिवास असलेल्या या जंगलातून जाणे येणे करण्यासाठी फार काही भीती वाटत नव्हती. पण या घटनेनंतर मात्र काळजी घ्यावी लागेल असे त्यांचे मत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close