तो आंघोळ करणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ

या व्हिडीओतून त्याने कमावले कोट्यावधी रुपये
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
वर्तमान काळात महिला कुठेही सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांना उपभोगाची वस्तू समजणाऱ्या पुरुषांच्या मानसिकतेत कुठलाही फरक दिसून येत नाही. आणि त्यामुळेच महिलांवरील अत्याचारात कमी होण्याऐवजी वाढ़ होत आहे. एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचे असे कारनामेसमोर आले आहेत की तुम्हालाही त्याचा राग येईल. हा व्यक्ती आंघोळ करतांनाचे महिकांचे व्हिडीओ बनवत होता.
या माध्यमातून त्याने कोट्यवधींची प्रॉपर्टीही जमवली आहे. मात्र, सध्या तो पोलिसांना गुंगारा देत असून, अद्यापही फरार आहे.
एक महिला आंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी घाटाच्या बाजूच्या चेंजिंग रूममध्ये गेली. तेव्हा तिची नजर वर बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडली. चेंजिंग रूमच्या अगदी वर बसवण्यात आलेल्या या कॅमेऱ्याबाबत महिलेने शनि मंदिराचे महंत मुकेश गोस्वामी याला विचारणा केली असता, त्याने संतप्त होऊन महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेने आपल्या मुलीसह पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची तक्रार दाखल केली.
दरम्यान, या महिलेच्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता चेंजिंग रूमच्या वर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह फीड महंत याच्या मोबाईलला जोडलेले असल्याचे आढळून आले. इतकेच नाहीतर तपासादरम्यान पोलिसांना मुकेश गोस्वामीच्या मोबाईलमध्ये दोन सिक्रेट फोल्डर सापडले. या फोल्डर्सना ‘हरिद्वार’ आणि ‘छोटा हरिद्वार’ असे नाव देण्यात आले.
सीसीटीव्ही ऍपही सापडला
याशिवाय एक सीसीटीव्ही ॲपही सापडला होता, जो मुकेश गोस्वामीने लपवला होता. अशा स्थितीत मुकेश गोस्वामी यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कोणासोबत शेअर केले होते का, अशीही शंका उपस्थित होत आहे. मात्र, त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना लॅपटॉप, पेन ड्राईव्ह किंवा व्हिडिओ सेव्ह करता येतील असे कोणतेही उपकरण सापडले नाही. गंगानगर घाटावर एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, चेंजिंग रूमच्या वर एकच कॅमेरा बसवण्यात आला आहे.
आधी 25, नंतर 50 आणि आता 1 लाखाचे बक्षीस
पोलिसांना महंत याचा मोबाईल सापडला. मात्र, तो स्वतः घटनास्थळावरून पळून गेला. तब्बल 4 महिने उलटूनही महंत फरार आहे. 23 मे रोजी महंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो कुठे लपला आहे, याचा कोणताही सुगावा अद्याप लागलेला नाही. गाझियाबाद पोलिसांनी शनिवारी महंतवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.