सामाजिक

सर्प मित्रांने दिले १२ फुट अजगराला जिवनदान

Spread the love

 

नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी

पवन ठाकरे 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातिल जावरा ( मोळवण ) येथे कार्तिक फिसके यांच्या शेतात चारा कापण्यासाठी मजुर गेले असता अचानक 12 फुट अजगर दिसला, त्या मजुराने शेतमालकांला फोनवरून सांगितले तसेच शेतमालकांनी नांदगाव खंडेश्वर येथील सर्प मित्र अमन मालवे व रोशन देशमुख यांना माहिती दिली, त्यांना माहीती मिळताच शेतात दाखल झाले व अजगराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली कालांतराने त्यांना अजगर पकडण्यास यश आले होते ,
त्यानंतर अजगराला पकडुन अमरावती येथील सर्पमित्र यांना बोलावून अमरावती जवळील दाटजंगलामध्ये सोडुन देण्यात आले असे सांगण्यात आले, सर्पमित्र अमन गवाले म्हणाले की आजवर अनेक विषारी बिनविषारी सापांना पकडून जगंलात सुखरूप सोडण्याचे काम आम्ही केले आहे, शासनाकडुन आम्हाला सर्प मित्राचे अधिकॄत ओळखपत्र दिले जावेत, बर्याच वेळा वेळा सापांबद्दल असणारे गैरसमज, अंधश्रद्धा आणि भिती यामुळे त्यांना सर्रास मारले जातात ‌.मात्र सापांना न मारता जवळच्याच सर्प मित्रांना बोलवावे जेणे करुन सापांचे प्राण वाचतील. सर्प है शेतातील उपद्रवी उंदीर खातात त्यामुळे ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत असे सर्पमित्र अमन मालवे सांगितले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3