रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला तर बहिणीने भावांना गमावले
औरंगाबाद (बिहार )/ पुणे / नवप्रहार मीडिया
रक्षाबंधनाचा सण बहीण आणि भावाच्या नात्यात प्रेमाची भर घालणारा सण म्हणून ओळखला जातो. पण या दिवशी जर बहीण आणि भावात कायमची ताटातुट घडविणारा प्रकार घडत असेल तर त्याला बहीण आणि भावाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.असा प्रकार बिहार च्या औरंगाबाद आणि पुणे येथे घडला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी तलावात बुडून पाच भावंडांचा मृत्यु झाला आहे. तलावात आंघोळ करताना बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला अन् बहिणीनं आपल्या भाऊरायांना कायमचं गमावलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे देखील समोर आली आहेत. शुभम कुमार, नीरज कुमार, धीरज कुमार, प्रिन्स कुमार आणि अमित कुमार अशी मृतांची नावे आहेत.
तलावात बुडून मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी विजयंत यांनी सांगितले की, सर्व मुले गावापासून काही अंतरावर असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेली होती. आंघोळ करत असताना ही मुले चुकून खोल पाण्यात गेली आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राखी बांधल्यानंतर सर्व मुले तलावात आंघोळीसाठी गेली होती.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
दरम्यान, तलावात मुले बुडाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी विजयंत यांच्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या तरतुदीनुसार मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे देखील समोर आली आहेत. शुभम कुमार, नीरज कुमार, धीरज कुमार, प्रिन्स कुमार आणि अमित कुमार अशी मृतांची नावे आहेत.
तर दुसरी घटना पुणे येठे घडली आहे. वैशाली नितीन शेंडगे (वय २६, रा. हडपसर मंतरवाडी, ता. हवेली) असे मृत्यू पडलेल्या बहिणीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरी भडक चंदनवाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
बहीण राखी बांधण्यासाठी आली असता तिचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर (वय ३४, रा. बोरीभडक कोपनर डेअरीजवळ, ता. दौंड) हे तिला घेऊन दुचाकी (क्र. एमएच ४२ डी ९५६) वरून पुणे- सोलापूर महामार्गावरून जात होते. हॉटेल जयभवानीसमोर आले असताना पाठीमागून आलेल्या पुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कार (क्र. एमएच ४२ झेड ४१४७) सफारी गाडीने जोरात धडक दिली, तसेच वैशाली हिला गाडीने फरफटत ओढत नेले. डोक्याला, हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागल्याने व ती जागीच बेशुद्ध पडल्याने तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक मोहन रावसाहेब डोंबे (रा. खोर डोंबेवाडी, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.