बुद्ध विहार व्यवस्थान कायदा निर्मितीसाठी सुरू केले हे बेमुदत धरणे आंदोलन स्थगीत

लाखांदुर प्रतिनिधी / नरेश गजभिये
लाखांदूर : हि धम्मसंहिता अँक्शन कमिटी ऑफ इंडियाकडून बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा निर्मितीसाठी अँड. दिलीप काकडे राष्ट्रीय मुख्य समन्वयक, दि धम्म संहिता अँक्शन कमिटी ऑफ इंडिया यांनी महाराष्ट्र शासनाला मार्च २०२२ ला महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या मसुद्यावर चर्चा करून, तो अंतीम करण्यासाठी मान मंत्री, अल्पसंख्यांक विकास, विभाग, यांचे अध्यक्षतेखाली “बुद्ध विहार कायदा समिती स्थापना करावी आणि त्यातील निवडक सदस्यांची अँड दिलीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात यावी. 1. या मागणीसाठी राज्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संस्था- संघटनांच्या सहकार्य व सहभागाने दि. १५ मार्च २०२३ बुधवारी सकाळी १०.०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरना आंदोलन केले होते. या आंदोलनात दि धम्म संहिता अँक्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक अँड दिलीप काकडे मुंबई, राष्ट्रीय संयोजक प्रा. अनिल कानेकर लाखांदूर भंडारा, डॉ. मुकेश दुपारे, पुणे, दादा मर्चंडे मंडनगड, कुशल कुमार जंगलबाग, अमरिश मेश्राम, अँड. मिलन जंगलबाग, मुकूंद रोटे, सरिता जंगल बाग, आनंद खरात, सुनिल वाघपंजे, मणिषा जंगलबाग हे व इतर राज्याच्या विविध भागातून विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्यगण, धम्म बंधू भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान जोगेन्द्रजी कवाडे सर व जयदीपजी कवाडे यांनी पेंडाल मध्ये येऊन आंदोदनाला पाठींबा दिला.
मान. मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन बैठक आयोजित करण्याचे प्रशासनला आदेश दिल्यामुळे बेमुदत धरणे आंदोदन सायंकाळी स्थगीत करण्यात आले.