क्राइम

आजारी पत्नीच्या छातीवर पतीचा बुक्क्यांचा मार ; पत्नी ठार

Spread the love

छत्रपती संभाजी नगर /नवप्रहार मीडिया

             संसार म्हटला की त्यात भांड्याला भांडे लागणेआलेच म्हणजेच पती पत्नीत छोटी भामंडणे आणि कुजबुज हा प्रकार आलाच. कधी कुटुंबातील मोठे लोक तर कधी शेजारी पाजारी आणि मित्र मंडळ अश्या प्रकरणात हस्तक्षेप करून अशी भांडणे मिटवतात. पण कधी हा वाद इतक्या टोकाला जातो की त्यात कोणाचा न कोणाचा ज8व जातो. पतीकडून आजारी पत्नीला छातीवर मारहाण केल्याने पत्नीने प्राण सोडल्याचा प्रकार छत्रपती संभाजी नगर मध्ये घडला आहे.

या घटनेत पत्नी आजारी असतानादेखील पतीने तिच्या छातीत बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेत जखमी कमल साबळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर छावणी पोलिसांनी पती रवींद्र कचरू साबळे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल यांचा 2009 मध्ये रवींद्र कचरू साबळे याच्यासोबत विवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मात्र, गेल्या एका वर्षापासून पतीने कमल यांचा छळ सुरू केला. तो सातत्याने पत्नीला मारहाण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसंच तिला नांदवण्यास नकार देत होता. याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा वादही होत असे.

17 ऑक्टोबर रोजी दुपारी त्याने पुन्हा आपल्या लहान मुलासमोर कमल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आरोपीने त्यांच्या छातीवरही मारहाण केली. त्यानंतर त्या अचानक बेशुद्ध झाल्या. कमल यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा 19 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे वडील कचरू अस्वले यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांनी पतिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close