क्राइम

शुल्लक कारणा वरून धाकटी ने थोरली ला भोसकले

Spread the love

बोरगाव मंजू ( अकोला ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     पूर्वी भावांपेक्षा बहिणीत जास्त पटते असे बोलल्या जायचे. पण जसजसा काळ बदलत आहे तसतसे प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात बदल घडत असल्याचे दिसून येत आहे. बोरगाव मंजू तालुक्यातील खडका गावात लहान बहिणीचा मोठ्या बहिणी सोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यामुळे लहाणीला इतका राग आला की तिने मोठ्या बहिणीला चाकूने भोसकले. ती तिच्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडे पर्यंत वार करत राहिली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

खडका येथे विठ्ठल वसतकार हे कुटुंबासह राहतात. त्यांची मोठी विवाहित मुलगी रेश्मा (२४) ही बुलढाण्याला असते. लहानी रविना (२१) घरीच असते. गेल्या आठवड्यात रेश्मा माहेरी आली होती. दोघी बहिणी बेडरूममध्ये बोलत असताना कोण्यातरी विषयावरून त्यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, संतापलेल्या रविनाने धारदार चाकूने रेश्मावर वार केले. आरडाओरड ऐकून आई-वडील येईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

रविना टीव्हीवर क्राइम शो पाहायची. क्राइम एपिसोडमध्ये रक्तरंजित हत्या, हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाल्याचे पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत समाेर आले. दोघी बहिणींमध्ये जिवापाड प्रेम होते. अधूनमधून त्या भांडायच्यासुद्धा; मात्र गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close