शैक्षणिक

शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे श्रीकांत देशमुख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Spread the love

मातोश्री विमालाबाई देशमुख सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.९/९
शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेनुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संस्थेअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालय व शाळेतील गुणवंत प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व उत्कृष्ट माध्यमिक यांचा गुणगौरव समारंभ मातोश्री विमालाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे नुकताच संपन्न झाला.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रसाद वाडेकर,संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर,भैय्यासाहेब पाटील,केशवराव मेतकर,कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले,कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ,प्राचार्य केशवराव गावंडे,सुरेश खोटरे,सचिव वी.गो.ठाकरे,प्राचार्य डॉ.एम.बी.एम.बी.ढोरे,नरेशचंद्र पाटील,प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम वायाळ,प्राचार्य डॉ.अमोल महल्ले उपस्थित होते.
याप्रसंगी स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत देशमुख यांचा त्यांनी दिलेल्या शैक्षणिक,क्रीडा,एनसीसी,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल वर्ग 5 ते 10 मधील माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा माध्यमिक शाळांमधून आदर्श शिक्षक पुरस्कारा निमित्त शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व झाडाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close